2024 Lok Sabha Elections: भाजपाने २०२४साठी जाहीर केली १५ राज्यांतील 'सेनापतीं'ची नावे; जावडेकर, पंकजा मुंडे, विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 08:42 PM2022-09-09T20:42:34+5:302022-09-09T20:43:19+5:30

भाजपाने कंबर कसली असून १५ राज्यांसह प्रभारी, सहप्रभारींची नावे जाहीर केली आहेत

bjp announce names of new in charges for 2024 lok sabha elections Prakash javadekar Vinod Tawde Pankaja Munde from Maharashtra | 2024 Lok Sabha Elections: भाजपाने २०२४साठी जाहीर केली १५ राज्यांतील 'सेनापतीं'ची नावे; जावडेकर, पंकजा मुंडे, विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी

2024 Lok Sabha Elections: भाजपाने २०२४साठी जाहीर केली १५ राज्यांतील 'सेनापतीं'ची नावे; जावडेकर, पंकजा मुंडे, विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी

googlenewsNext

2024 Lok Sabha Elections: आगामी म्हणजेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा कंबर कसत असून आज पक्षाने विविध राज्यांतील 'सेनापतीं'ची नियुक्ती केली आहे. भाजपाने १५ राज्यांमध्ये आपले नवे प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, जेपी नड्डा यांनी नावांच्या यादीवर शिक्कामोर्तब केले आहे आणि ही यादी तत्काळ लागू करण्यात आली आहे. या यादीत माजी केंद्रीय मंत्री असलेले महाराष्ट्राचे प्रकाश जावडेकर (Prakash javadekar), तसेच राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde)  व पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना केरळ प्रभारीपद सोपवले असून महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांच्यावर बिहारची जबाबदारी आहे. याशिवाय, ओम माथूर हे छत्तीसगडचे, बिप्लब कुमार देब हे हरियाणाचे, लक्ष्मीकांत वाजपेयी हे झारखंडचे, राधामोहन अग्रवाल हे लक्षद्वीपचे, पी मुरलीधर राव हे मध्य प्रदेशचे, विजय पंजाब आणि विजय राव हे चंदीगडचे, तरुण चुघ हे तेलंगणाचे, अरुण सिंग हे राजस्थानचे, महेश शर्मा हे त्रिपुराचे, मंगल पांडे हे पश्चिम बंगालचे आणि संबित पात्रा हे ईशान्य भारताचे प्रभारी असणार आहेत.

काही राज्यांत सहप्रभारींचीही नियुक्ती

खासदार हरीश द्विवेदी बिहारमधून, आमदार नितीन नबीन छत्तीसगडमधून, खासदार डॉ. राधामोहन अग्रवाल केरळमधून, पंकजा मुंडे आणि डॉ. रमाशंकर कथेरिया मध्य प्रदेशमधून, नरिंदर सिंग रैना पंजाबमधून, अरविंद मेनन तेलंगणातून, विजया रहाटकर राजस्थानातून, अमित मालवीय आणि डॉ. आशा लाक्रा पश्चिम बंगालमधून तर ऋतुराज सिन्हा यांना ईशान्येकडील राज्यांतून सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

Web Title: bjp announce names of new in charges for 2024 lok sabha elections Prakash javadekar Vinod Tawde Pankaja Munde from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.