भाजपने मुरली मनोहर जोशींचे तिकीट कापले; वरुण-मनेकांची अदलाबदल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 07:18 PM2019-03-26T19:18:53+5:302019-03-26T20:06:04+5:30
भाजपाने मंगळवारी 39 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये उत्तर प्रदेशचे 29 आणि पश्चिम बंगालच्या 10 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
नवी दिल्ली : भाजपाने मंगळवारी 39 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये उत्तर प्रदेशचे 29 आणि पश्चिम बंगालच्या 10 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपाने कानपूरमधून मुरली मनोहर जोशी यांचे तिकीट कापले असून त्यांच्याजागी सत्देव पचौरी यांना उतरवले आहे. तर काही तासांपूर्वी सपाच्या खासदार राहिलेल्या जयाप्रदा यांना रामपूरमधून तिकिट देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे मनेका गांधी आणि वरुण गांधी यांच्या जागांची अदलाबदल केली आहे.
5 खासदारांचे तिकीट कापले
भाजपाने विद्यमान खासदारांपैकी 5 जणांचे तिकीट कापले आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, रामपूरचे डॉ. नैपाल सिंह, बाराबंकीचे प्रियंका सिंह रावत, इटावाचे अशेक दोहरे आणि बलियाच्या भारत सिंह यांचा समावेश आहे.
तीन जागांची अदलाबदली
वरुण गांधी, मनेका गांधी आणि रामशंकर कठेरिया यांच्या जागा बदलल्या आहेत. वरुण गेल्यावेळी सुल्तानपूरमधून जिंकले होते. त्यांना पिलीभीतचे तिकीट देण्यात आले होते. मनेका गांधी या पिलीभीतच्या खासदार आहेत. त्यांना सुल्तानपूरची उमेदवारी देण्यात आली आहे. आग्राचे खासदार रामशंकर यांना इटावाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर आग्राचे एसपी सिंह बघेल उमेदवार आहेत.
Satyadev Pachauri to contest for BJP from Kanpur, Uttar Pradesh. Virendra Singh Mast to contest from Ballia. #LokSabhaElections2019https://t.co/l6HqWIDfDv
— ANI (@ANI) March 26, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सोडलेली वाराणसीची जागा
2014 मध्ये जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी वाराणसीची जागा सोडली होती आणि कानपूरहून जिंकले होते. 85 वर्षीय मुरली मनोहर जोशी हे भाजपाचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. ते 1977 पासून 2014 पर्यंत 6 वेळा खासदार झाले आहेत.
23 वर्षांत पहिल्यांदाच तिकीट कापले आहेत. पहिली लोकसभा निवडणूक 1977 मध्ये जिंकले होते. यानंतर ते 1996 मध्ये पुन्हा निवडून आले होते. यानंतर 2014 पर्यंत त्यांनी लोकसभेची प्रत्येक निवडणूक लढविली होती.