मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करताच दिल्लीत भाजपचा होतो पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 02:44 PM2020-01-07T14:44:13+5:302020-01-07T14:45:42+5:30

अमित शाह यांनी ट्विट करून दिल्लीतील जनता केवळ पंतप्रधान मोदींच्या कामावर विश्वास ठेवून मतदान करेल, असं सांगत मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय भाजप निवडणुकीला सामोरे जाणार असे संकेत दिले आहे.

BJP announces chief ministerial candidate, defeat in Delhi | मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करताच दिल्लीत भाजपचा होतो पराभव

मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करताच दिल्लीत भाजपचा होतो पराभव

Next

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष आपलं काम आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेच्या जोरावर पुन्हा सत्ता काबीज करण्याची आशा बाळगून आहे. तर भाजप केंद्र सरकारने केलेले काम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा दाखवून निवडणूक जिंकण्याची तयारी करत आहे. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला आतापर्यंत एकदाही दिल्लीकरांचे मने जिंकता आली नाही. त्यामुळे भाजपने यावेळी एक युक्ती काढली आहे. 

भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या एकाही उमेदवाराला दिल्लीतील फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भाजपने केंद्रीय नेतृत्वाच्या जोरावरच निवडणुकीला जाण्याचे निश्चित केले आहे. केंद्रीयमंत्री अमित शाह यांनीच पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेवर ही निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहे. दिल्लीत 1993 पासून 2015 पर्यंत सहा विधानसभा निवडणुका पार पडल्या. यापैकी पाच वेळा भाजप मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासह निवडणुकीला गेला. प्रत्येकवेळी भाजपला पराभवच पत्करावा लागला. 

आतापर्यंत केवळ एकदाच भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला नव्हता. त्यावेळी भाजपने विजय मिळवला होता. भाजपने सरकार देखील स्थापन केले होते. तेव्हा मुख्यमंत्रीपदाची माळ मदनलाल खुराना यांच्या गळ्यात पडली होती.  त्यामुळे काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी मनोज तिवारी यांचे पुढे केलेले नाव पुन्हा मागे घेण्यात आले. 

या संदर्भात अमित शाह यांनी ट्विट करून दिल्लीतील जनता केवळ पंतप्रधान मोदींच्या कामावर विश्वास ठेवून मतदान करेल, असं सांगत मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय भाजप निवडणुकीला सामोरे जाणार असे संकेत दिले आहे.
 

Web Title: BJP announces chief ministerial candidate, defeat in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.