तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची १२ उमेदवारांची चौथी यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 05:53 AM2023-11-08T05:53:00+5:302023-11-08T05:53:15+5:30
या निवडणुकांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
हैदराबाद : भाजपने तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी मंगळवारी जाहीर केली. त्यामध्ये १२ उमेदवारांचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
या चौथ्या यादीमध्ये दुर्गम अशोक (चेन्नूर-राखीव मतदारसंघ), व्ही.सुभाष रेड्डी (येल्लारेड्डी), तुला उमा (वेमुलावाडा), बोम्मा श्रीराम चक्रवर्ती (हुस्नाबाद), दुडी श्रीकांत रेड्डी (सिद्धीपेट), पेद्दिन्ती नवीन कुमार (विकाराबाद-राखीव मतदारसंघ), बंटू रमेश कुमार (कोदंगल), बोया शिवा (गडवाल), सदिनेनी श्रीनिवास (मिर्यालगुडा), चालमाला कृष्णा रेड्डी (मुनुगोडे), नाकरकांती मोगुलैया (नाक्रेकल-राखीव मतदारसंघ) आणि अजमीरा प्रल्हाद नाईक (मुलुग-राखीव मतदारसंघ) या भाजप उमेदवारांचा समावेश आहे. तेलंगणामध्ये सत्ताधारी पक्ष बीआरएस, भाजप आणि काॅंग्रेसमध्ये प्रमुख लढत आहे.
जनसेना पक्षाला १९ जागा मिळणार
तेलंगणा विधानसभेत ११९ जागा आहेत. चौथ्या यादीसह भाजपने आतापर्यंत आपल्या १०० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजप उर्वरित १९ जागा जनसेना पक्षाला देण्याची शक्यता आहे.