Northeast election results 2018: 'आज नाखूश तो बहुत होगे तुम'; आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 04:41 PM2018-03-03T16:41:05+5:302018-03-03T16:53:54+5:30

सत्तेत असूनही शिवसेना कायमच भाजपा सरकारच्या केंद्र आणि राज्यातील धोरणांवर टीका करत असते.

BJP Ashish shelar take a dig over Shivsena after Tripura election results 2018 | Northeast election results 2018: 'आज नाखूश तो बहुत होगे तुम'; आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

Northeast election results 2018: 'आज नाखूश तो बहुत होगे तुम'; आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

Next

मुंबई: ईशान्य भारतातील भाजपाच्या विजयानंतर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला. सत्तेत असूनही शिवसेना कायमच भाजपा सरकारच्या केंद्र आणि राज्यातील धोरणांवर टीका करत असते. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील अग्रलेखातून अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला जातो. एकूणच भाजपची शक्य असेल त्या मार्गांनी नाचक्की करायचा प्रकार शिवसेनेकडून सुरू असतो. त्यामुळेच भाजपाने आज त्रिपुरा आणि नागालँडमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर आशिष शेलार यांना प्रसारमाध्यमांकडून शिवसेनेकडून होणाऱ्या टीकेबद्दल छेडण्यात आले. त्यावेळी शेलारांनी जंजीर या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या संवादाचा आधार घेत शिवसेनेला चिमटा काढला. भाजपच्या आजच्या विजयानंतर मला काहीजणांना ''आज नाखूश तो बहुत होगे तुम", असे म्हणावेसे वाटत असल्याचे शेलारांनी सांगितले. 

ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघायल आणि नागालँड या तीन राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये त्रिपुरात भाजपाने ऐतिहासिक यश संपादित करत डाव्यांची सत्ता उलथवून लावण्याचा पराक्रम करून दाखवला. तर नागालँडमध्येही भाजपाने एनपीएफमधून फुटून निघालेले माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नेपीयू रीयो यांच्या  नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीशी (एनडीपीपी) भाजपाने युती केली होती. आतापर्यंतचे कल पाहता नागालँडमध्येही भाजपने नव्या मित्रासोबत (एनडीपीपी) चांगले यश मिळवल्याचे चित्र आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपा पुन्हा सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. तर मेघालयमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी याठिकाणी भाजपाने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी रणनीती आखायला सुरूवात केली आहे. मेघालय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कोहली यांनी म्हटले की, इतर पक्षाची कामगिरी पाहता यंदाच्या निवडणुकीत जनमत काँग्रेसविरोधी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आम्ही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर आम्ही इतर पक्षांशी बोलणी करू, असे कोहली यांनी म्हटले. तर भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनीदेखील मेघालयमध्ये बिगरकाँग्रेसी सरकार पाहायला मिळेल, असे संकेत दिले. हेमंत बिश्व शर्मा हे लवकरच मेघालयमध्ये जातील, असे राम माधव यांनी सांगितले. सध्या देशातील केवळ पाच घटक राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे काँग्रेस मेघालय कायम राखणार का, याविषयी आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: BJP Ashish shelar take a dig over Shivsena after Tripura election results 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.