BJP: भाजपचा आजपासून सामाजिक न्याय पंधरवाडा, पंतप्रधान मोदी करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:13 AM2022-04-06T07:13:24+5:302022-04-06T07:13:50+5:30
BJP Politics: भारतीय जनता पक्ष पक्ष स्थापनेच्या दिवसापासून (६ एप्रिल) सामाजिक न्याय पक्ष पंधरवडा साजरा करणार आहे. या १५ दिवसांत पक्ष खासदारांसह पक्षाचे सर्व कार्यकर्ते सरकारच्या जनहित योजना जनतेत घेऊन जातील. लोकांना रोज एका योजनेबाबत माहिती दिली जाईल.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष पक्ष स्थापनेच्या दिवसापासून (६ एप्रिल) सामाजिक न्याय पक्ष पंधरवडा साजरा करणार आहे. या १५ दिवसांत पक्ष खासदारांसह पक्षाचे सर्व कार्यकर्ते सरकारच्या जनहित योजना जनतेत घेऊन जातील. लोकांना रोज एका योजनेबाबत माहिती दिली जाईल.
पक्ष स्थापना दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. मोदी यांनी खासदारांना ६ ते २० एप्रिलपर्यंत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा प्रचार व प्रसार करून जनतेत जाण्यास सांगितले आहे. खासदारांना सांगण्यात आले आहे की, प्रत्येक घरी नळ आणि आयुष्यमान भारतसारख्या जनकल्याण योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचवल्या जाव्यात.
८ एप्रिल प्रधानमंत्री आवास योजनेसाठी, ९ एप्रिल प्रत्येक घरी नळ आणि १० एप्रिल हा पीएम किसान निधीसाठी ठरवला गेला आहे. भाजप वेगवेगळ्या सामाजिक योजनांकडे लाभार्थींचे लक्ष वेधेल.