सिनेताऱ्यांना भाजपा उतरविणार निवडणूक रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 04:05 AM2018-08-10T04:05:02+5:302018-08-10T04:05:12+5:30
आगामी निवडणुकीत अशा २५-३० जागा आपल्या पारड्यात खेचण्याचा भाजपाचा इरादा आहे. यापैकी बव्हंशी जागा दक्षिण आणि पूर्व भारतातील आहेत.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : रूपेरी पडदा, छोट्या पडद्यावरील तारे-तारका किंवा समाजातील बुद्धिवंतांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत लोकसभेच्या आगामी निवडणुकीत अशा २५-३० जागा आपल्या पारड्यात खेचण्याचा भाजपाचा इरादा आहे. यापैकी बव्हंशी जागा दक्षिण आणि पूर्व भारतातील आहेत.
भाजपाने पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील अशा जागाही जवळपास निश्चित केल्या आहेत. या राज्यात जम बसविण्यासाठी भाजपा झटत आहे. या राज्यांतील २४ ते २५ जागी चित्रपटातील तारे-तारका, टीव्ही मालिकेतील लोकप्रिय कलाकार आणि बुद्धिवंत व्यक्तींना लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याचा भाजपाचा विचार आहे.
दक्षिण आणि पूर्व भारतातील जागा कशा वाढविता येतील, हे भाजपापुढे आव्हान आहे. २०१९च्या निवडणुकीत मात्र २०१४सारखे यश न मिळाल्याच्या स्थितीत दक्षिण-पूर्व भारतातून आपली स्थिती मजबूत करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. याशिवाय पश्चिम बंगाल, ओडिशातही भाजपाला कठीण स्थितीला सामोरे जावे लागेल. हे ध्यानात घेऊन भाजपा फिल्मी तारे-तारका, टीव्ही कलाकार आणि बुद्धिवंतांना उमेदवारी देण्याचा विचार करीत आहे.
>न मिळणाºया जागा मिळवण्याची धडपड
फिल्मी ताºयांचा जनमानसांवर प्रभाव असल्याचे त्यांचे चाहते त्यांना उत्साहाने मतदान करतात. भाजपाच्या या रणनीतीमुळे दक्षिण-पूर्व भारतातील भाजपा कार्यकर्त्यांची उत्साहात भर पडणार असल्याने यश मिळेल, अशी आशा भाजपा बाळगून आहे. मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने याच रणनीतीचा अवलंब करून न मिळणाºया जागाही पटकावल्या होत्या.