केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन; वजन कमी करून फॅटची फिट झाली TV तील तुलसी, पाहा PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 07:00 PM2021-06-16T19:00:59+5:302021-06-16T19:03:01+5:30
मनीष पॉल स्मृती इराणी यांना भेटण्यासाठी गेला होता. येथे स्मृती यांनी काढा पाजून त्याचे स्वाग केले. याच भेटीचे फोटो मनीषने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री आणि माजी TV अॅक्ट्रेस स्मृती इराणी यांच्या नव्या फोटोत जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन दिसत आहे. आज सोशल मीडियावर आलेल्या फोटोंमध्ये त्या बऱ्याच स्लीम आणि फिट झालेल्या दिसत आहेत. TV अॅक्टर आणि होस्ट मनीष पॉलने स्मृती इराणी यांचे हे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (BJP Central Minister of textiles Smriti Iranis fat to fit transformation maniesh paul shared latest photo)
मनीष पॉल स्मृती इराणी यांना भेटण्यासाठी गेला होता. येथे स्मृती यांनी काढा पाजून त्याचे स्वाग केले. याच भेटीचे फोटो मनीषने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या फोटोत स्मृती यांचा लुक बराच बदललेला दिसत आहे. स्मृती यांच्या मागील काही फोटोंचा विचार करता, त्या फोटोंमध्ये त्या बऱ्याच फॅटी दिसत आहेत. मात्र, मनीषने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांचे वजन कमी झाल्याचे दिसत आहे.
मनीषने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, एक कप काढा पाजण्यासाठी स्मृती मॅडमचे धन्यवाद. काय वेळ आली आहे. चहा ऐवजी सर्वजण काढा प्यायला लागले आहेत. मात्र, मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. केवळ फोटोसाठीच मास्क काढला होता. सर्वांना प्रेम, स्प्रेड लव. मनीषच्या या पोस्टवर काही युझर्सनीदेखील स्मृती यांच्या फीट लूकला नोटीस केले आहे.
24 वर्षांची असताना केला होता TV शो -
45 वर्षांच्या स्मृती सोशल मिडिया अकाउंटवर आपले थ्रो बॅक फोटोज शेअर करत असतात. यात अनेक वेळा त्यांचा लुक 2000 मध्ये आलेला आपला TV शो 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मधील असतो.