UP Election 2022: “योगी आदित्यनाथ हे मेहनती, प्रामाणिक; त्यांच्यासारखा मुख्यमंत्री शोधून सापडणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 04:34 PM2021-06-06T16:34:08+5:302021-06-06T16:40:50+5:30
UP Election 2022: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (UP Election 2022) भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.
लखनऊ: एकीकडे कोरोनाचे संकट कायम असून, दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (UP Election 2022) भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून, राजकीय हालचालींनी वेग घेतल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अतिशय प्रामाणिक, मेहनती असून, त्यांच्यासारखा दुसरा मुख्यमंत्री शोधून सापडणार नाही, असे कौतुकोद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी काढले आहेत. (bjp up chief swatantra dev singh give appreciation cm yogi adityanath and his work)
गेल्या काही दिवासांपासून उत्तर प्रदेश मंत्रिमंडळ बदल, विस्तार यांवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह भाजप नेतृत्वाला योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्वास असून, आगामी विधानसभा निवडणुका योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाऊ शकतात, असे संकेत दिले जात असतानाच दुसरीकडे मात्र योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या बड्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले नसल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.
भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात FIR; ताडपत्री चोरल्याचा आरोप
योगींसारखा दुसरा मुख्यमंत्री शोधून सापडणार नाही
भाजपचे उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासारखा मुख्यमंत्री शोधून सापडणार नाही. योगी आदित्यनाथ अतिशय मेहनती आणि प्रामाणिक आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात कायद्याचे राज्य स्थापन केले आहे, असे स्वतंत्र देव सिंह यांनी म्हटले आहे.
“कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त; मी रोज करते, तुम्हीही करा”: हेमा मालिनी
राधामोहन सिंह यांनी घेतली राज्यपालांची भेट
उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता असल्याच्या चर्चा सुरू असून, या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी राधामोहन सिंह यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. मंत्रिमंडळातील रिक्त जागा लवकरच भरल्या जातील. योगी आदित्यनाथ योग्य वेळी निर्णय घेतली. भाजपचे संघटन कार्य उत्तर प्रदेशमध्ये उत्तम प्रकारे सुरू आहे, असे राधामोहन सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
“संभाजीराजे मोठं व्यक्तिमत्त्व, नारायण राणेंनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे”; राऊतांचा टोला
दरम्यान, साधारण सहा महिन्यांनंतर उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर योगी कॅबिनेटमध्ये फेरबदल होऊ शकतात. एके शर्मा यांना कॅबिनेटमध्ये मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू होऊन भाजपने तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.