गुजरातेतून राज्यसभेच्या दोन जागांसाठी भाजप-काँग्रेस संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 07:08 AM2019-06-14T07:08:58+5:302019-06-14T07:09:15+5:30
दोघांचेही दावे : काँग्रेसची एकाच तारखेला मतदान घेण्याची मागणी
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी लोकसभा सदस्य बनल्यामुळे गुजरातमधून राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या या दोन जागांसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. या दोन्ही जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत तर संख्या बळाच्या आधारावर काँग्रेस एका जागेवर दावा करीत आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
या दोन्ही जागा आपल्या ताब्यात याव्यात यासाठी भाजप निवडणूक आयोगाच्या मदतीने रिक्त झालेल्या जागांची अधिसूचना वेगवेगळी जारी करण्यात यशस्वी झाल्यानंतर या दोन्ही जागांसाठी वेगवेगळ्या तारखांना निवडणूक व्हावी अशी योजना तो बनवत आहे.
भाजपच्या या योजनेचा सुगावा लागताच काँग्रेसने उत्तर देणारी व्यूहरचना करून निवडणूक आयोगाला निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे या दोन जागांसाठी वेगवेगळ््या तारखांना मतदान घेतले जाऊ नये.
काँगे्रसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी भाजपच्या या प्रयत्नाचा खुलासा म्हणाले की, भाजप निवडणूक आयोगाचा वापर करून दोन जागांसाठी वेगवेगळ््या तारखांना मतदान घेण्याचा कट आखत आहे. असाच कट त्याने अहमद पटेल
यांना राज्यसभा निवडणुकीत हरवण्यासाठी आखला होता. तसाच कट या निवडणुकीतही आखून आमदारांची खरेदी भाजपला करता येईल.
जुन्या परंपरेचे पालन भाजपची एक जागा कमी
गुजरात विधानसभेत काँग्रेसला ७१ आमदारांचा पाठिंबा असून भाजपला १८२ सदस्यांच्या (सध्या ती घटून १७५ सदस्यांची बनली आहे) विधानसभेत १०० आमदारांचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एक आणि बीटीपीला दोन आमदारांचा पाठिंबा आहे. या संख्याबळानुसार जर निवडणूक आयोगाने जुन्या परंपरेचे पालन करून एकाच तारखेला निवडणूक घेतली तर काँग्रेस भाजपकडून एक जागा हिसकावून घेण्यात यशस्वी ठरेल. परंतु, काँग्रेसला संशय आहे की, निवडणूक आयोगाच्या मदतीने एकाच तारखेला मतदान घेतले जाऊ नये म्हणून भाजप सगळे उपाय करील. म्हणजे दोन्ही जागा त्याला ताब्यात ठेवता येतील.