भाजप-काँग्रेसचे ट्विटरवर युद्ध
By admin | Published: January 1, 2016 02:10 AM2016-01-01T02:10:11+5:302016-01-01T02:10:11+5:30
गेले वर्षभर संसदेत, संसदेबाहेर आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून परस्परांवर मनसोक्त चिखलफेक केल्यानंतर आता नववर्षाच्या प्रारंभी काँग्रेस व भाजपाचे सोशल मीडियावर ‘टिष्ट्वटरयुद्ध’ भडकले आहे.
नवी दिल्ली : गेले वर्षभर संसदेत, संसदेबाहेर आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून परस्परांवर मनसोक्त चिखलफेक केल्यानंतर आता नववर्षाच्या प्रारंभी काँग्रेस व भाजपाचे सोशल मीडियावर ‘टिष्ट्वटरयुद्ध’ भडकले आहे. काँग्रेसने केंद्रातील रालोआ सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा दावा करीत मायक्रो ब्लॉगिंग साईटवर ‘मोदी फेल्युअर्स २०१५’ ही मोहीम उघडली आहे तर ‘मोदी गव्ह. रॉक्स’ सुरू करीत भाजपानेही काँग्रेसला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अफगाणिस्तानमधील भाषणापासून तर कौशल्य विकासमंत्री राजीवप्रताप रुडी यांनी वाराणसीत केलेल्या ई-रिक्षाच्या शुभारंभापर्यंतचे अनेक विषय, छायाचित्रे आणि एवढेच नव्हे तर लेखांचाही वापर करीत भाजपाच्या निष्ठावंतांनी काँग्रेसच्या टिष्ट्वटरवरील मोहिमेला प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनीही ‘मोदी गव्ह. रॉक्स’ अंतर्गत या टिष्ट्वटर युद्धात उडी घेतली. महिलांच्या सुरक्षेसाठी २० हजार रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कसे लावण्यात आले हे सांगत त्यांनी मोदी सरकारचे गुणगान केले आहे.
भाजपने दरवर्षी २.५ कोटी नवीन रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु एप्रिल आणि जून २०१५ या दरम्यान केवळ ४३००० हजार नवे रोजगार निर्माण झाल्याचे त्यात नमूद केले आहे. पाकिस्तानने ९०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतरही मोदी लाहोरला
का गेले, असा सवाल काँग्रेसने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)