गुजरातमधील तीनही जागा भाजपा लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 05:51 AM2017-07-26T05:51:53+5:302017-07-26T05:52:01+5:30

गुजरातमध्ये पुढील महिन्यात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपने या तिन्हा जागा लढवायचा निर्धार केल्यामुळे मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे.

BJP to contest all thress seats in Gujarat | गुजरातमधील तीनही जागा भाजपा लढवणार

गुजरातमधील तीनही जागा भाजपा लढवणार

Next

हरीश गुप्ता
नवी दिल्ली : गुजरातमध्ये पुढील महिन्यात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपने या तिन्हा जागा लढवायचा निर्धार केल्यामुळे मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे.
काँग्रेसमधून नुकतेच बाहेर पडलेले व महत्वाकांक्षी नेते शंकरसिंह वाघेला यांना भाजपने तिसरी जागा लढवा, असे संकेत दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पुढील महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार असून तीत वाघेला यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाघेला यांचे चांगले संबंध आहेत. तथापि, वाघेला नाखुष असून या तिसºया जागेसाठी माझ्या पसंतीच्या उमेदवाराचा विचार करावा, असे त्यांनी सूचवले आहे. यावर बुधवारी अंतिम निर्णय होणार आहे.
भाजपला तिन्ही जागा जिंकण्यासाठी अतिरिक्त १७ आमदारांची गरज आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख २८ जुलै आहे. भाजपचे संसदीय मंडळ अंतिम निर्णय २६ जुलै रोजी घेईल. वाघेला यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून केलेल्या बंडामुळे भाजपमध्ये उत्साह निर्माण झाला असून त्याने काँग्रेसचे अहमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी तिसरा उमेदवार उभा करण्याचे ठरवले.
वाघेला यांनी पुढे येऊन परत भाजपात दाखल व्हावे व स्वत:च राज्यसभेची तिसरी जागा लढवावी अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा आहे. परंतु वाघेलांची त्यास तयारी नाही. या पार्श्वभूमीवर अहमद पटेल यांची फेरनिवड सहजपणे होण्यात अनिश्चितता निर्माण झाली आहे. १८२ सदस्यांच्या गुजरात विधानसभेत भाजपचे १२३ आमदार असून भाजपच्या दोन उमेदवारांचा विजय राज्यसभेवर निश्चित आहे.

काँग्रेसकडे ५६ आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि जनता दलचा (यु) एक अशा तिघांच्या पाठिंब्यावर वाघेला बंड करायच्या आधी एक जागा निश्चितपणे त्याला जिंकता येणार होती. वस्त्रोद्योग व माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांची राज्यसभेवर फेर नियुक्ती करण्याची तयारी झाली आहे.

Web Title: BJP to contest all thress seats in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.