दिल्ली विधानसभेसाठीही भाजपकडून पाकला पाचारण; पाकिस्तानच्या मुद्दावर प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 02:47 PM2020-01-23T14:47:36+5:302020-01-23T14:48:27+5:30

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा मुद्दा उकरून काढत जनतेला मतदान करण्याची मागणी केली होती. ए

BJP convenes for Delhi assembly too; Propaganda on the issue of Pakistan | दिल्ली विधानसभेसाठीही भाजपकडून पाकला पाचारण; पाकिस्तानच्या मुद्दावर प्रचार

दिल्ली विधानसभेसाठीही भाजपकडून पाकला पाचारण; पाकिस्तानच्या मुद्दावर प्रचार

Next

नवी दिल्ली - दिल्लीत येत्या 8 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. येथे आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र भाजप नेत्याने दिल्लीतील लढत म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे इतर राज्यातील निवडणुकांप्रमाणेच दिल्ली विधानसभा निवडणुकीतही पाकिस्तानची एन्ट्री झाली आहे.

याआधी 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत देखील पाकिस्तानला अशाचप्रकारे केंद्रस्थानी आणले गेले होते. त्यावेळी अशा प्रकारचे वक्तव्य भाजपकडूनच करण्यात आले होते. त्यावेळी भाजपच्या अध्यक्षपदी अमित शाह होते. बिहारमध्ये आयोजित एका सभेत शाह म्हणाले होते की, बिहारमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानात फटके फुटतील. त्यावेळी निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागला नाही. मात्र शाह यांच्या वक्तव्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल कऱण्यात आली होती.

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा मुद्दा उकरून काढत जनतेला मतदान करण्याची मागणी केली होती. एवढच काय तर लोकसभा निवडणूक भाजपने पाकिस्तानच्या मुद्दावर लढलली होती. आता भाजपने पुन्हा एकदा निवडणुकीसाठी पाकिस्तान अस्त्र उगारले आहे.

सत्ताधारी आम आदमी पार्टीकडून विधानसभा निवडणूक लाईट, पाणी, शिक्षणाच्या मुद्दावर लढविण्यात येत आहे. त्याचवेळी विरोधीपक्ष नेते कपिल मिश्रा 'आप'ला पाकिस्तानच्या मुद्दावर घेरण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या 8 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील रस्त्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत पाहायला मिळणार असं मिश्रा यांनी सांगितले.

Web Title: BJP convenes for Delhi assembly too; Propaganda on the issue of Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.