नरेंद्र मोदींच्या वाराणसीतच भाजपा पराभूत

By admin | Published: January 12, 2015 11:37 AM2015-01-12T11:37:22+5:302015-01-12T11:40:26+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघातील कॅँटोन्मेंट बोर्डाच्या सातही जागांवर भाजपाचा पराभव झाल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

BJP defeats Narendra Modi in Varanas | नरेंद्र मोदींच्या वाराणसीतच भाजपा पराभूत

नरेंद्र मोदींच्या वाराणसीतच भाजपा पराभूत

Next

ऑनलाइन लोकमत 

वाराणसी, दि. १२ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघातील कॅँटोन्मेंट बोर्डाच्या सातही जागांवर भाजपाचा पराभव झाल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे अपक्षांकडून भाजपाचा पराभव झाल्याने स्थानिक भाजपा नेत्यांची नाचक्की झाली आहे.
वाराणसी कँटोन्मेंटमधील सात जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६८. ४३ ऐवढी होती. भाजपाने पहिल्यांदाच कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत अधिकृत उमेदवार उतरवले होते आणि या उमेदवारांसाठी भाजपाचे उत्तरप्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी, स्थानिक जिल्हाध्यक्ष, महापौर यांनी प्रचारसभाही घेतली होती. रात्री उशीरा या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये भाजपाचा सातही जागांवर पराभव झाला आहे. मोदींच्या मतदारसंघात भाजपाचा पराभव होणे ही पक्षाची नाचक्की असल्याची चर्चा आता रंगली आहे. 
 
कँटोन्मेटं बोर्डाची निवडणूक कशासाठी ?
 
देशभरात ६२ कँटोन्मेंट (छावणी) असून कँटोन्मेंट हे देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. कँटोन्मेंट परिसरातील नागरी सुविधांसाठी कँटोन्मेंट बोर्ड असते आणि निवडणुकीद्वारे या बोर्डावर सदस्यांची निवड केली जाते. कँटोन्मेंट परिसरात राहणारे नागरिक यामध्ये मतदानाचा हक्क बजावतात. 

Web Title: BJP defeats Narendra Modi in Varanas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.