दिल्लीत भाजपा की आप? आज फैसला
By admin | Published: February 10, 2015 03:14 AM2015-02-10T03:14:11+5:302015-02-10T03:20:09+5:30
उत्कंठा वाढविणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा फैसला मंगळवार, १० फेब्रुवारीला लागणार असून, राजधानीतील तख्तासाठी
Next
नवी दिल्ली : उत्कंठा वाढविणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा फैसला मंगळवार, १० फेब्रुवारीला लागणार असून, राजधानीतील तख्तासाठी भाजपा आणि आम आदमी पार्टी यांच्यात थेट लढत असल्याचे चित्र आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ होऊन दु. १ पर्यंत अंतिम निकाल हाती येणे अपेक्षित आहे. १४ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे. सर्व मतदानोत्तर चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) सर्वाधिक जागा आपला मिळतील, असे भाकीत वर्तविले आहे.