भाजपाचा निवडणूक अजेंडा लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 05:18 AM2018-08-25T05:18:31+5:302018-08-25T05:19:03+5:30
भाजपा लवकरच आपल्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविणार असून, त्यात अन्य मुद्द्यांसह राजस्थान, छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा अजेंडा निश्चित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : भाजपा लवकरच आपल्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविणार असून, त्यात अन्य मुद्द्यांसह राजस्थान, छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा अजेंडा निश्चित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना या विधानसभा निवडणुकीसाठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. विशेषत: भाजपाचे लक्ष राजस्थानावर आहे. तिथे भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत असून, काँग्रेसला आघाडी मिळू शकते. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांचे वर्चस्व कायम राहील, असा भाजपाचा अंदाज आहे.
मुख्यमंत्री परिषद; राजस्थान, छत्तीसगडबाबतही होणार चर्चा
छत्तीसगडमध्ये अजित जोगी काय करतील, यावर काँग्रेसची स्थिती अवलंबून आहे, असे भाजपाला वाटत आहे. या बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या जातील. चार राज्यांच्या डिसेंबरमधील विधानसभा निवडणुकांनंतर लोकसभा निवडणुकीसाठी अधिक वेळ मिळणार नाही. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करण्यासोबतच अधिकाधिक योजना लोकार्पित करण्याचे निर्देशही देण्यात येणार आहेत. राज्यातील भाजप सरकारने गत काही वर्षांत काय पावले उचलली आहेत, हे त्यातून लोकांना समजेल.
हेही मुद्दे महत्त्वाचे
पंतप्रधान आवास योजना, मुद्रा योजना, स्किल योजनेशिवाय आर्थिक साधनांशी संबंधित योजना जनतेपर्यंत नेण्याबाबतही परिषदेत चर्चा होणार आहे. अनावश्यक वादांपासून दूर राहण्यासोबतच बेजबाबदार वक्तव्ये न करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. राम मंदिर, जमावाकडून होणाºया हत्या यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.