स्मार्ट सिटी आराखडयासाठी भाजपची फिल्डिंग

By Admin | Published: December 10, 2015 11:57 PM2015-12-10T23:57:49+5:302015-12-10T23:57:49+5:30

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याचा स्मार्ट सिटी आराखडयास मुख्य सभेने अंतिम मंजूरी द्यावी याकरिता भारतीय जनता पक्षाच्यावतीने जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र मुख्यसभेने हा प्रस्ताव ४ जानेवारीपर्यंत पुढे ढकल्याने पुण्याचा स्पर्धेतील सहभाग धोक्यात आला होता. यापार्श्वभुमीवर पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांनी नागपूरला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. स्मार्ट सिटी आराखडयावर १४ डिसेंबर पर्यंत निर्णय घेण्याचे मुख्यसभेला आदेश राज्यशासनाने द्यावेत याकरिता त्यांनी मोठे लॉबिंग केले. त्यानुसार राज्य शासनाने आदेश जारी केले आहेत.

BJP fielding for smart city layout | स्मार्ट सिटी आराखडयासाठी भाजपची फिल्डिंग

स्मार्ट सिटी आराखडयासाठी भाजपची फिल्डिंग

googlenewsNext
णे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याचा स्मार्ट सिटी आराखडयास मुख्य सभेने अंतिम मंजूरी द्यावी याकरिता भारतीय जनता पक्षाच्यावतीने जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र मुख्यसभेने हा प्रस्ताव ४ जानेवारीपर्यंत पुढे ढकल्याने पुण्याचा स्पर्धेतील सहभाग धोक्यात आला होता. यापार्श्वभुमीवर पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांनी नागपूरला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. स्मार्ट सिटी आराखडयावर १४ डिसेंबर पर्यंत निर्णय घेण्याचे मुख्यसभेला आदेश राज्यशासनाने द्यावेत याकरिता त्यांनी मोठे लॉबिंग केले. त्यानुसार राज्य शासनाने आदेश जारी केले आहेत.

Web Title: BJP fielding for smart city layout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.