भाजपाने दिले एलडीएफला मत
By admin | Published: June 4, 2016 02:32 AM2016-06-04T02:32:30+5:302016-06-04T02:32:30+5:30
माकपाचे के.पी. श्रीरामकृष्णन यांना शुक्रवारी १४ व्या केरळ विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. विशेष म्हणजे भाजपचे एकमेव सदस्य ओ. राजगोपाल यांनी श्रीरामकृष्णन यांच्या बाजूने मतदान केले.
Next
अध्यक्षपद निवड
तिरुवनंतपुरम : माकपाचे के.पी. श्रीरामकृष्णन यांना शुक्रवारी १४ व्या केरळ विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. विशेष म्हणजे भाजपचे एकमेव सदस्य ओ. राजगोपाल यांनी श्रीरामकृष्णन यांच्या बाजूने मतदान केले.
श्रीरामकृष्णन (एलडीएफ) यांना ९२ मते मिळाली, तर यूडीएफचे उमेदवार व्ही.पी. सजिंद्रन यांना ४६ मते मिळाली. एलडीएफला मतदान करणाऱ्या भाजप नेत्याने सांगितले की, यूडीएफने जाहीरपणे सांगितले होते की, त्यांना भाजप सदस्याच्या मताची गरज नाही.