भाजपने दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर - कुमार विश्वास

By admin | Published: August 30, 2014 10:00 AM2014-08-30T10:00:03+5:302014-08-30T12:39:26+5:30

'भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती' असा दावा 'आम आदमी पक्षा'चे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे.

BJP gave the offer of the Chief Minister - Kumar Vishwas | भाजपने दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर - कुमार विश्वास

भाजपने दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर - कुमार विश्वास

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३० - 'भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती' असा दावा 'आम आदमी पक्षा'चे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे. तसेच 'आप'च्या ज्या १२ आमदारांना निवडणुका नको आहेत, तेही विश्वास यांना मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन द्यायला तयार आहेत, असे आपल्याला सांगण्यात आल्याचे विश्वास यांनी म्हटले आहे. भाजपाने मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे. 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन दिवसांनी गाझियाबाद येथील निवासस्थानी पहिल्यांदाच खासदार बनलेल्या नेत्याने विश्वास यांची भेट घेतली होती. विश्वास यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. '१९ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास एक खासदार माझ्या घरी आले होते. पहाटे साडेतीनपर्यंत ते मला समजावत होते की भाजपचे सरकार बनवण्यासाठी मी मदत करावी. मुख्यमंत्री म्हणून मला समर्थन देण्यास ते तयार आहेत, असेही त्यांनी मला सांगितले', असे विश्वास म्हणाले.
 'पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून आपण येथे आल्याचा दावा त्या खासदाराने केला. आणि मी या प्रस्तावास मंजूरी दिल्यास ते मला अशोका हॉटेलमध्ये नेऊन योग्य व्यक्तीची भेट घालून देतील, असेही त्यांनी सांगितले. पण मी हा प्रस्ताव साफ फेटाळून लावला आणि पक्षाला (आप) याबद्दल लगेच कळवले, असेही विश्वास पुढे म्हणाले.  मात्र त्या खासदाराचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. 
भारतीय जनता पक्षाने विश्वास यांनी केलेला दावा फेटाळून लावला असून 'विश्वास आत्ता याबद्दल का बोलत आहेत?' असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय सचिव आर. पी. सिंह यांनी विचारला आहे. 'अरविंद केजरीवाल माझ्या घरी आले होते आणि मला मु्ख्यमंत्रीपदाची ऑफर दिली' असा दावा मीही करू शकतो असे सांगत 'ह्या सर्व क्लृप्त्या फक्त चर्चेत राहण्यासाठी असल्याचा' आरोप सिंह यांनी केला आहे. 'एवढेच असेल तर त्यांनी त्या खासदाराचे नाव सांगवे', असेही सिंह म्हणाले. 
विश्वास यांनी अमेठीतून निवडणूक लढवली होती व त्यांचा पराभव झाला होता. 

Web Title: BJP gave the offer of the Chief Minister - Kumar Vishwas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.