"मोदी तेरा कमल खिलेगा..."; खरी ठरली PM यांची भविष्यवाणी, त्रिपुरासह तीन राज्यांत मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 02:56 PM2023-03-02T14:56:07+5:302023-03-02T14:59:37+5:30

पंतप्रधानांची ही भविष्यवाणी आता खरी ठरताना दिसत आहे...

bjp gets big win congress and left lost tripura meghalaya nagaland election result | "मोदी तेरा कमल खिलेगा..."; खरी ठरली PM यांची भविष्यवाणी, त्रिपुरासह तीन राज्यांत मोठा फायदा!

"मोदी तेरा कमल खिलेगा..."; खरी ठरली PM यांची भविष्यवाणी, त्रिपुरासह तीन राज्यांत मोठा फायदा!

googlenewsNext

मेघालयची राजधानी शिलाँग येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते, विरोधक 'मर जा मोदी-मर जा मोदी' म्हणत आहेत, पण जनता 'मोदी तेरा कमल खिलेगा', म्हणत आहे. पंतप्रधानांची ही भविष्यवाणी आता खरी ठरताना दिसत आहे. त्रिपुरामध्ये भाजप 32 जागांवर आघाडीवर असून पुन्हा एकदा सरकार स्थापन करताना दिसत आहे. याशिवाय नागालँडमध्येही भाजप 12 जागांवर आघाडीवर आहे, यांपैकी 2 जागा जिंकल्या आहेत. याच बरोबर मेघालयात सामना अडकला आहे. येथे एकूण 60 जागा आहेत. NPP जवळपास 24 जागांवर आघाडीवर आहे, हा आकडा बहुमतापेक्षा बराच दूर आहे. अशा स्थितीत एनपीपी भाजपसोबत 5 जागा आणि इतर काही जागांसह सरकार स्थापन करू शकते.

यापूर्वीही भाजप एनपीपी सरकारचा भाग होता. अशा प्रकारे या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचा सत्तेत वाटा असेल. मतांचा विचार करता, यातही भाजपची स्थिती अत्यंत चांगली आहे. एकेकाळी भाजप ईशान्येकडील राज्यांमध्ये सर्वात कमकुवत पक्ष समजला जात होता. याळेवी भाजपला त्रिपुरामध्ये 39 टक्के मते मिळाली आहेत. नागालँडमध्येही 18 टक्के लोकांनी भाजपला पसंती दिली आहे. याशिवाय मेघालयातही 8 टक्के मते भाजपच्या खात्यात जात आहेत. मेघालयात टीएमसीलाही 5 जागा मिळू शकतात. पण त्यांना सत्तेपासून दूरच रहावे लागेल. दरम्यान, एनपीपीचे कोनराड संगमा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त आहे. अशा स्थितीत दोघे मिळून सरकार स्थापन करू शकतात.

भाजपसाठी त्रिपुराचा विजय हा सर्वात महत्त्वाचा असेल. 2018 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपला, यापूर्वी येथे तुरळकच यश मिळायचे. पण गेल्या 5 वर्षांपूर्वी भाजपने येथे पहिल्यांदाच सरकार स्थापन केले. अशा स्थितीत येथे पुन्हा एकदा सत्तेवर येणे भाजपसाठी मोठी गोष्ट आहे. बंगाली आणि आदिवासी समाज मोठ्या संख्येने असलेल्या त्रिपुरामध्ये भाजपचा विजय देशभरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषत: आदिवासीबहुल भागात भाजपला याचा फायदा होऊ शकतो. आदिवासींची लोकसंख्या १ कोटीहून अधिक असलेल्या मध्य प्रदेशात याच वर्षी निवडणुका होत आहेत. येथे भाजप त्रिपुराच्या विजयाचा उल्लेख करून आदिवासी मतांना आपल्याकडे आर्षित करू शकते.

Web Title: bjp gets big win congress and left lost tripura meghalaya nagaland election result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.