भाजपा सरकार दळभद्री घुले: कोपरगावात राष्ट्रवादीचा मेळावा

By admin | Published: July 18, 2015 01:12 AM2015-07-18T01:12:28+5:302015-07-18T01:12:28+5:30

कोपरगाव: गेल्या सात महिन्यात १८५० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या़ भाजपाचे सरकार अपशकुनी आणि दळभद्री असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केली़

BJP government Dalhadhi mobilized: NCP rally in Kopargaon | भाजपा सरकार दळभद्री घुले: कोपरगावात राष्ट्रवादीचा मेळावा

भाजपा सरकार दळभद्री घुले: कोपरगावात राष्ट्रवादीचा मेळावा

Next
परगाव: गेल्या सात महिन्यात १८५० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या़ भाजपाचे सरकार अपशकुनी आणि दळभद्री असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केली़
राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचा सत्कार व तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी कोपरगाव येथे पार पडला, यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक छबुराव आव्हाड होते़
घुले म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्ज माफी, वीज बिल माफ व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याची आमची मागणी असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे घुले यांनी स्पष्ट केले़
आशुतोष काळे म्हणाले, माजी आ़ अशोक काळे यांनी केलेल्या विकास कामांची उद्घाटने लोकप्रतिनिधी कोपरगाव शहरासह तालुक्यात करीत आहेत़ असे असले तरीही आम्हाला जनतेच्या समस्या सुटल्याचे समाधान आहे़ जनतेला न्याय मिळावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे़ त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचीही आमची तयारी असल्याचे ते म्हणाले़ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, पद्मकांत कुदळे, दीपक साळुंके, आनंदराव चव्हाण, बाळासाहेब बारहाते, सुधाकर दंडवते, सूर्यभान कोळपे, एम़टी़ रोहमारे, दत्तोबा जगताप, कारभारी आगवन, दिलीपराव बोरनारे आदींची उपस्थिती होती़

Web Title: BJP government Dalhadhi mobilized: NCP rally in Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.