भाजप सरकार धोकेबाज : यलगुलवार काँग्रेसचा मोर्चा : चारा छावण्या सुरु करा, शेतकर्यांना मदत द्या !
By admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:49+5:302015-08-26T23:32:49+5:30
सोलापूर : केंद्र व राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आणि सत्तेत आल्यानंतर केवळ पोकळ घोषणाबाजी केली आहे. हे सरकार धोकेबाज असून, या सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी येथे केले.
Next
स लापूर : केंद्र व राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आणि सत्तेत आल्यानंतर केवळ पोकळ घोषणाबाजी केली आहे. हे सरकार धोकेबाज असून, या सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी येथे केले.केंद्र व राज्य शासनाच्या हुकूमशाही मानसिकतेचा आणि जनतेची मुस्कटदाबी करण्याच्या तंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष यलगुलवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.यलगुलवार पुढे म्हणाले की, मोठय़ा अपेक्षेने जनतेने भाजपला निवडून दिले. पण निवडणुकीत त्यांनी दिलेले एकही आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही. शेती, उद्योग, व्यापार, शेतकर्यांच्या आत्महत्या, बेरोजगारांना काम, शेतकर्यांना कर्जमुक्ती, मदत, दुष्काळ निवारण उपाययोजना, पाणीपुरवठा, कांदा, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, भ्रष्टाचार या सर्व पातळ्यांवर केंद्र व राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हे सरकार केवळ घोषणा करणारे व धोकेबाज आहे. त्यामुळे या सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन यलगुलवार यांनी कार्यकर्त्यांसमोर केले. यावेळी महापौर सुशीला आबुटे, प्रदेश सचिव धर्मा भोसले, सुधीर खरटमल, माजी आ. निर्मलाताई ठोकळ, माजी महापौर अँड. यु. एन. बेरिया, मनपा सभागृह नेते संजय हेमगड्डी यांची भाजप सरकारवर हल्लाबोल करणारी भाषणे झाली.काँग्रेस भवन येथून काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे जंबो शिष्टमंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या मोर्चात प्रदेश सचिव सुरेश पाटोळे, युवक अध्यक्ष अमोल शिंदे, सेवादल अध्यक्ष अशोक कलशे?ी, एनएसयुआयचे अध्यक्ष गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, अनिल आबुटे, माणिकसिंग मैनावाले, सिध्दाराम चाकोते, अश्विनी जाधव, अजय दासरी, राहुल गायकवाड, भारत जाधव, देवेंद्र भंडारे, आरिफ शेख, अनिता म्हेत्रे, सरस्वती कासलोलकर, मंदाकिनी तोडकरी, र्शीदेवी फुलारे, अंबादास गुत्तीकोंडा, आझम सैफन, राजन कामत, केशव इंगळे, उपेंद्र ठाकर, मनोज यलगुलवार, पांडुरंग चौधरी, किसन मेकाले, ए. डी. चिनीवार, शरणप्पा दुर्लेकर, अरविंद भांडेकर, नामदेव राठोड, नरसिंग कोळी, सिद्राम अ?ेलूर, जेम्स जंगम, नृसिंह आसादे, बाबू विटे, करण म्हेत्रे, नामदेव राठोड, हसीब नदाफ, वीणा देवकते, बसवराज म्हेत्रे, नरेंद्र इंगळे, राजाभाऊ सलगर, अनिल म्हस्के, बजरंग जाधव, अविनाश जाधव, उमेश सुर्ते, विवेकानंद कंदकुरे, करण म्हेत्रे, जॉन फुलारे, सुमन जाधव, हेमा चिंचोळकर, परशुराम सतारवाले, सूर्यकांत शेरखाने, बाबा करगुळे, विनोद भोसले, नागनाथ कदम, विजय साळुंके, राजेश झंपले, रमेश फुले, विजय भोसले, भगवान गायकवाड, शिवाजी कदम, हाजीमलंग नदाफ, लतीफ मल्लाबादकर, हारुन शेख, लतीफ शेख, करीम शेख, गुलाम शेख, शकुर शेख, बशीर शेख, सादिक शेख, वाहिद नदाफ, डॉ. अप्पासाहेब बगले, संजय गायकवाड, मधुकर कांबळे, बाबू विटे, बाबू म्हेत्रे, रविप्रभा लोंढे, प्रमिला तुपलवंडे, आरती हबीब, संध्या काळे, शोभा बोबे, मल्लेश सूर्यवंशी, पंडित गणेशकर, र्शीराम काडादी, सोपान थोरात, धैर्यशील बाबरे, शिवाजी जाधव, विजय जाडकर, राजू जाडकर, राजू बनसोडे, मळसिध्द कोळी आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)इन्फो.. या केल्या मागण्याजनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराआत्महत्याग्रस्त शेतकर्यांना मदत द्याशेतकर्यांचे कर्ज सरसकट माफ करादुष्काळग्रस्तांना मदत जाहीर कराशेतकर्यांना दुबार पेरणीसाठी मदत द्यागारपीटग्रस्तांना मदत कराभाववाढ रोखाइन्फाउपजिल्हाधिकारी संतापलेकाँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येताच तेथून निवेदन देण्यासाठी पाच ते सहा जणांचे शिष्टमंडळ जाण्याऐवजी शंभर ते दीडशे जणांचा नेते व कार्यकर्त्यांचा जथ्था हातात झेंडे व फलक घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमख यांच्या कार्यालयात घुसला. यामुळे कार्यालयात प्रचंड गर्दी आणि दाटीवाटी झाली. यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी चांगलेच संतापले. पाच-सहा जणांचे शिष्टमंडळ सोडून एवढी गर्दी का?, असा सवाल त्यांनी केला. तेव्हा फोटो काढेपर्यंत राहू द्या, असे सांगून स्थानिक नेत्यांनी फोटोसेशन झाल्यानंतर कार्यकर्त्यांना बाहेर काढले.फोटो ओळी