भाजपा सरकार देणार आणीबाणीच्या आठवणींना उजाळा

By admin | Published: June 22, 2017 04:35 PM2017-06-22T16:35:52+5:302017-06-22T19:21:14+5:30

आणीबाणी हे प्रजासत्ताक भारताच्या इतिहासातील एक काळे पान मानले जाते. आणीबाणी जाहीर करण्याच्या निर्णयामुळे कणखर आणि धाडसी

The BJP government will empower the nation's emergencies | भाजपा सरकार देणार आणीबाणीच्या आठवणींना उजाळा

भाजपा सरकार देणार आणीबाणीच्या आठवणींना उजाळा

Next

 ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - आणीबाणी हे प्रजासत्ताक भारताच्या इतिहासातील एक काळे पान मानले जाते. आणीबाणी जाहीर करण्याच्या निर्णयामुळे कणखर आणि धाडसी निर्णयांसाठी लोकप्रिय असलेल्या इंदिरा गांधी यांच्यावर अजूनही टीका होत असते. आता आणीबाणीच्या काळातील कटू आठवणींना पुन्हा उजाळा देण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. त्यासाठी 25 जूनला आणीबाणीच्या 42 व्या वर्षपूर्ती दिवशी मोदी सरकार आपल्या मंत्र्यांना देशाच्या विविध भागात पाठवणार आहे.  आणीबाणीच्या कटू स्मृतींबाबत लोकांना माहिती देणे हा याचा हेतू असेल.
1975 साली तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात होत असलेल्या आंदोलनांना नियंत्रणात आणण्यासाठी अंतर्गत आणीबाणीची घोषणा केली होती. त्यानंतर आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या विरोधी पक्षामधील अनेक नेत्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले होते.

( देशात अघोषित आणीबाणी )

( हा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणी )

आता आणीबाणीच्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी केंद्र सरकारकडून देशभरात  कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. या कार्यक्रमात भाजपाचे नेते आणीबाणीच्या वेळच्या परिस्थितीबाबत चर्चा करणार आहेत, ज्यामुळे आणीबाणी लागू करण्यात आली. याबाबत भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, "आणीबाणीच्या काळात बिगर काँग्रेसी सरकारांचा सत्तापालट एका दिवसांत झाला होता. ही बाब आजच्या तरुणांच्या विस्मृतीत जाऊ नये, अशी आमची इच्छा आहे."  आता भाजपाच्या या खेळीमुळे देशातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. 

Web Title: The BJP government will empower the nation's emergencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.