अग्निवीरांना सरकारी नोकरीची भाजपने दिली हरयाणामध्ये गॅरंटी; २ लाख नोकऱ्यांसोबत २० आश्वासने दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 07:48 AM2024-09-20T07:48:13+5:302024-09-20T07:51:22+5:30

महिलांना प्रत्येक महिन्याला २,१०० आर्थिक मदत करण्यासोबतच राज्यातील अग्निवीरांना सरकारी नोकरीची हमी पक्षाच्या जाहीरनाम्यात दिली आहे.

BJP guarantees government jobs to fire fighters in Haryana; Made 20 promises with 2 lakh jobs | अग्निवीरांना सरकारी नोकरीची भाजपने दिली हरयाणामध्ये गॅरंटी; २ लाख नोकऱ्यांसोबत २० आश्वासने दिली

अग्निवीरांना सरकारी नोकरीची भाजपने दिली हरयाणामध्ये गॅरंटी; २ लाख नोकऱ्यांसोबत २० आश्वासने दिली

चंडीगड : पाच ऑक्टोबर रोजी होणाऱ्या हरयाणा विधानसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्यातील युवकांसाठी २ लाख नोकऱ्यांसोबत भाजपने वेगवेगळी २० आश्वासने दिली आहेत. महिलांना प्रत्येक महिन्याला २,१०० आर्थिक मदत करण्यासोबतच राज्यातील अग्निवीरांना सरकारी नोकरीची हमी पक्षाच्या जाहीरनाम्यात दिली आहे.

हरयाणात पुढील महिन्यातील निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी जाहीरनाम्यात २४ पिकांची किमान आधारभूत किमतीत (एमएसपी)खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करणे, इंटर-सटी एक्स्प्रेस मेट्रो सेवा सुरू करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.

काही प्रमुख घोषणा...

nअग्निवीरांना सरकारी नोकरी

nमहिलांना २,१०० रुपये देणार

nयुवकांसाठी २ लाख सरकारी नोकऱ्या देणार.

n५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर

nशहरी व ग्रामीण भागात ५ लाख घरे बांधणार.

nग्रामीण महाविद्यालयातील विद्यार्थिनींना स्कूटर देणार.

nओबीसी, एससीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती.

nप्रत्येक कुटुंबाला १० लाखांपर्यंतचे मोफत उपचार.

Web Title: BJP guarantees government jobs to fire fighters in Haryana; Made 20 promises with 2 lakh jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा