'दारू पाजली, जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला'; हरयाणा भाजप प्रदेशाध्यक्षांसह दोघांविरोधात गँगरेपचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 20:28 IST2025-01-14T20:26:34+5:302025-01-14T20:28:35+5:30
Mohan Lal Badoli News: दिल्लीतील एका महिलेने भाजपचे हरयाणाचे प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बदोली यांच्यासह गायक रॉकी मित्तल यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. बलात्कार करून नग्न फोटो आणि व्हिडीओ काढल्याचेही महिलेने म्हटले आहे.

'दारू पाजली, जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला'; हरयाणा भाजप प्रदेशाध्यक्षांसह दोघांविरोधात गँगरेपचा गुन्हा
दिल्लीतील महिलेवर हिमाचल प्रदेशातील कसौली येथील एका हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे हरयाणाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बदोली आणि गायक रॉकी मित्तल यांच्याविरोधात सामूहिक बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. (fir against haryana bjp chief mohan lal badoli for raping a woman in kasauli, himachal pradesh)
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पीडित महिला दिल्लीची असून, ती हिमचल प्रदेशला फिरायला गेली होती. पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत भाजप प्रदेशाध्यक्ष बदोली आणि रॉकी मित्तल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मोहन लाल बदोली यांच्यावर आरोप काय?
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, मी बॉस आणि एका मैत्रिणीसह हिमाचल प्रदेशला फिरण्यासाठी गेलो होतो. तिथे कसौली येथील एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. ३ जुलै २०२३ रोजी माझी ओळख भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बदोली आणि गायक जय भगवान ऊर्फ रॉकी मित्तल सोबत झाली."
"त्यांनी आम्हाला गप्पा मारण्यासाठी रूममध्ये बोलवलं. जय भगवान मला म्हणाला की, पुढच्या अल्बममध्ये हिरोईन म्हणून तुला संधी देतो. मोहन लाल बडोली म्हणाले की, माझे खूप वरपर्यंत संबंध आहेत, मी तुला चांगली सरकारी नोकरी लावून देतो. त्यांनी आमची स्तुती करणं सुरू केलं आणि आम्हाला दारू पिण्याचा आग्रह केला. पण, आम्ही नकार दिला", असे तक्रारीत म्हटलेले आहे.
'आमचं म्हणणं ऐकलं नाही तर मारून टाकेन'
महिलेने पुढे म्हटलं आहे की, "आम्ही नकार देऊनही त्यांनी आम्हाला बळजबरीने दारू पाजली. त्यानंतर त्यांनी आम्हाला त्रास देणं सुरू केलं. मी त्याला विरोध केला. त्यानंतर माझ्या मैत्रिणीला बाजूला बसायला सांगितले आणि त्यानंतर मला म्हणाले आमचं म्हणणं ऐक नाही तर मारून टाकेन असं ते म्हणाले. त्यानंतर दोघेही आक्रमक झाले आणि त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. त्यांनी माझे नग्न फोटो आणि व्हिडीओही काढले."
"तू जर याबद्दल कुठे वाच्यता केली, तर तुला गायब करून टाकू अशी धमकीही त्यांनी मला दिली. आम्हाला खूप लाज वाटली. त्यानंतर दोन महिन्यापूर्वी त्यांनी आम्हाला पंचकुलाला बोलवलं आणि आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर आम्ही रॉकी मित्तलचा पंचकुलात, तर मोहन लाल बदोलीचा सोनीपतमध्ये पत्ता शोधला", असे तक्रारीत म्हटले आहे.
"आरोपींविरोधात कठोरात कठोर करावा आणि मला न्याया द्यावा. त्याचबरोबर त्यांच्या मोबाईलमधील माझे फोटो आणि व्हिडीओही डिलीट करावेत", असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३७६ (सामूहिक बलात्कार) आणि कलम ५०६ (धमकी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.