भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले, माजी  मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 06:15 PM2023-05-05T18:15:17+5:302023-05-05T18:22:23+5:30

सहा वेळा आमदारपद भूषवविणारे जगदीश शेट्टर सातव्यांदा हुबळी धारवाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत

BJP has destroyed my self esteem, said former Chief Minister Jagdish Shettar | भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले, माजी  मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांनी व्यक्त केलं मत

भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले, माजी  मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांनी व्यक्त केलं मत

googlenewsNext

चंद्रकांत कित्तुरे

हुबळी : मला आता कोणतीही राजकीय आकांक्षा राहिलेली नाही. विधानसभेत निरोपाचे भाषण करुन सन्मानपूर्वक निरोप घ्यायचा तेवढीच इच्छा होती. पक्षाला ती कळविली होती. मात्र उमेदवारी नाकारुन भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले. हा आत्मसन्मान कायम राखण्यासाठीच काँग्रेसकडून निवडणूकीच्या मैदानात उतरलो आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी लोकमतशी बोलताना केले.

सहा वेळा आमदारपद भूषवविणारे जगदीश शेट्टर सातव्यांदा हुबळी धारवाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हुबळी येथील आपल्या निवासस्थानालाच त्यांनी कार्यालयाचे स्वरुप दिले आहे. गुरुवारी सकाळी या कार्यालयातच त्यांची भेट घेतली. हावेरी जिल्ह्यातील हिरेकेरुर येथील काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या सभेच्या तयारीसाठी तिकडे रवाना होण्याच्या तयारीत ते होते. त्यामुळे घाईघाईतच ते प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलले.

काँग्रेस मानवतावादी विचारांचा पक्ष

आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द भाजपमध्ये गेली आहे. वैचारिकदृष्ट्याही काँग्रेस आणि भाजप वेगळे आहेत त्यामुळे काँग्रेसकडून लढताना, भाजपच्या मतदारांना सामोरे जाताना अडचण होत नाही का? या प्रश्नावर शेट्टर म्हणाले, काँग्रेस हा मानवतावादी विचारांचा, सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. मतदारांचे म्हणाल तर सुरवातीला थोडे अडचणीचे वाटले पण कार्यकर्ते आणि नागरिकांना मी काय आहे हे माहीत असल्याने त्यांनीही मला समजून घेतले आहे. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे निवडून येण्यात कोणतीही अडचण वाटत नाही.

भाजपला मीच उभे केले

भाजपचे उमेदवार महेश टेंगिनकाई तर तुम्हाला गुरू मानतात. यावर काय सांगाल. टेंगिनकाई माझे सहकारी होते. मात्र ते बी.एल संतोष यांच्या अधिक जवळचे होते. त्यांच्यासाठी संतोष यांनीच माझ्या उमेदवारीला खोडा घातला. हुबळीत मी १९९४ पासून मी आमदार आहे. भाजपला मीच येथे उभे केले आहे. हुबळीसह जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. अजूनही सुरू आहेत. माझ्याविरोधात नागरिकांत अजिबात असंतोष नाही त्यामुळे मला येथे काहीच अडचण नाही असे शेट्टर यांनी सांगितले.

त्यांच्याबद्दल आदरच

काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी आपल्या कार्यालयात अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे फोटो आहेत याबाबत विचारता शेट्टर म्हणाले, मला भाजपने दुखावले आहे. कार्यकर्ते फोटो काढत होते. पण मीच त्यांना थांबवले. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च नेते असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहेच.

Web Title: BJP has destroyed my self esteem, said former Chief Minister Jagdish Shettar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.