भाजपाने गोरखपूर येथून भोजपुरी स्टार रवी किशनला दिली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 17:15 IST2019-04-15T17:14:48+5:302019-04-15T17:15:40+5:30
भाजपाने उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल विभागातील आठ लोकसभा मतदारसंघांसाठी आज उमेदवारांची घोषणा केली आहे.

भाजपाने गोरखपूर येथून भोजपुरी स्टार रवी किशनला दिली उमेदवारी
नवी दिल्ली - भाजपाने उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल विभागातील आठ लोकसभा मतदारसंघांसाठी आज उमेदवारांची घोषणा केली आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वास्तव असलेल्या गोरखपूर मतदारसंघात भाजपाने भोजपुरी स्टार रवि किशन याला उमेदवारी दिली आहे. तर नुकताच भाजपात प्रवेश करणारे गोरखपूर येथील खासदार प्रवीण निषाद यांना संत कबीरनगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाने आज जाहीर केलेल्या आठ उमेदवारांमध्ये प्रतापगड येथून संगम लाग गुप्ता, आंबेडकरनगर येथून मुक्त बिहारी, संत कबीरनगर येथून प्रवीण निषाद, गोरखपूर येथून रवी किशन, देवरिया येथून रमापती राम त्रिपाठी, जौनपूर येथून के.पी. सिंह आणि भदोही येथून रमेश बिंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
21st List of BJP candidates for ensuing General Elections to the Parliamentary Constituencies of Uttar Pradesh finalised by BJP CEC. https://t.co/U8uSd9Mwyypic.twitter.com/dHthBSyTbb
— BJP (@BJP4India) April 15, 2019