भाजपने निवडणुकीवर खर्च केले २७ हजार कोटी रुपये; एवढी रक्कम आली कोठून?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 03:54 AM2019-06-08T03:54:23+5:302019-06-08T03:54:38+5:30

या अहवालात याचाही खुलासा करण्यात आला आहे की, लोकसभा निवडणुकीत जो एकूण खर्च झाला त्याची ४५ टक्के रक्कम एकट्या भाजपने आपल्या निवडणूक मोहिमेवर खर्च केली आहे.

BJP has spent Rs 27,000 crore on election; Where did the money come from? | भाजपने निवडणुकीवर खर्च केले २७ हजार कोटी रुपये; एवढी रक्कम आली कोठून?

भाजपने निवडणुकीवर खर्च केले २७ हजार कोटी रुपये; एवढी रक्कम आली कोठून?

Next

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत ‘३०० पार’चा नारा देऊन जिंकलेल्या भाजपने निवडणुकीत २७ हजार कोटी रुपये पाण्यासारखे खर्च केले आहेत. ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’च्या ताज्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे.

या अहवालात याचाही खुलासा करण्यात आला आहे की, लोकसभा निवडणुकीत जो एकूण खर्च झाला त्याची ४५ टक्के रक्कम एकट्या भाजपने आपल्या निवडणूक मोहिमेवर खर्च केली आहे. या अहवालानुसार निवडणूकीचा एकूण खर्च ५५ हजार कोटी एवढा झाला आहे.
भाजपने ४३७ जागांवर आपले उमेदवार उभे केले. तर, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ६२ कोटी रुपये खर्च केले. या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने विचारले आहे की, अखेर एवढी रक्कम आली कोठून? पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, २०१९ मध्ये निवडणुकी भाजपने जो खर्च केला त्यातून देशाच्या आरोग्य बजेटची ४३ टक्के भरपाई झाली असती. १० टक्के भरपाई संरक्षण बजेटची आणि ४५ टक्के मनरेगाची झाली असती. काँग्रेसने नमामि गंगेवर सवाल उपस्थित केले आहेत आणि म्हटले आहे की, मोदी सरकारने पाच वर्षात गंगा स्वच्छतेवर २४ हजार कोटी खर्च केले आहेत. पण, गंगा स्वच्छ झाली का?

प्रत्येक मतदारावर केला ७०० रुपये खर्च
या सर्व्हे रिपोर्टमध्ये याचाही उल्लेख करण्यात आला आहे की, भाजपने प्रत्येक मतदारावर ७०० रुपये खर्च केले. म्हणजेच, प्रत्येक मतदारसंघात १०० कोटी एवढी रक्कम होते. काँग्रेसने असा दावा केला आहे की, देशातील १० ते १२ टक्के मतदारांनी हे स्वीकार केले आहे की, त्यांना भाजपकडून मत टाकण्यासाठी नगदी रक्कम देण्यात आली.

निवडणूक आयोगावर सवाल उपस्थित करत अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे की, निवडणूक बॉण्डमध्ये पारदर्शकता आणली जावी. कारण, निवडणूक बॉण्डबाबत जी व्यवस्था करण्यात आली त्यावरून असे वाटते की, सत्तारूढ पक्षाला लाभ देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली.

काँग्रेसने अशीही मागणी केली आहे की, तत्काळ राष्ट्रीय निवडणूक निधीची स्थापना करण्यात यावी. यात कोणीही व्यक्ती आपल्या इच्छेनुसार दान देऊ शकेल.

Web Title: BJP has spent Rs 27,000 crore on election; Where did the money come from?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा