लोकसभा निवडणुकासाठी भाजप मैदानात! समितीची स्थापना, देशातील नाराज नेत्यांशी संपर्क करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 01:57 PM2024-01-02T13:57:25+5:302024-01-02T14:03:33+5:30

देशात काही महिन्यातच लोकसभा निवडणुका होणार आहेत, आता निवडणुकीची रणनीती आखण्यास भाजपने सुरुवात केली आहे.

BJP in the field for the Lok Sabha elections Forming a committee, will contact the disgruntled leaders of the country | लोकसभा निवडणुकासाठी भाजप मैदानात! समितीची स्थापना, देशातील नाराज नेत्यांशी संपर्क करणार

लोकसभा निवडणुकासाठी भाजप मैदानात! समितीची स्थापना, देशातील नाराज नेत्यांशी संपर्क करणार

BJP ( Marathi News ) :  देशात काही महिन्यातच लोकसभा निवडणुका होणार आहेत, आता निवडणुकीची रणनीती आखण्यास भाजपने सुरुवात केली आहे. आगामी होणारी निवडणुकीबाबत मंगळवारी भाजपची दिल्लीत बैठक झाली, या बैठकीसाठी देशात मोठे उपस्थित होते. यावेळी देशातील नाराज नेत्यांबाबत चर्चा झाली. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती देशातील नाराजी नेत्यांशी संपर्क करणार आहे. 

१३४ वर्षांची लढाई, ५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले? CJI चंद्रचूड म्हणाले...

ही समिती देशातील अन्य पक्षातील नाराज नेत्यांसोबत संपर्क करण्याचे काम करणार आहे, त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचेही ही समिती काम करणार आहे. या समितीला अधिकारही दिले जाणार आहेत. या समितीची मान्यता मिळाल्यानंतरच कोणत्याही नेत्याचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश शक्य होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. याशिवाय राज्यांतील पक्षाचे पदाधिकारीही सहभागी झाले आहेत.

याशिवाय २२ जानेवारीला अभिषेक सोहळ्यासंदर्भात भाजपची दुसरी बैठक अयोध्येत होत आहे. यामध्ये कार्यक्रमाची रणनीती निश्चित केली जाणार आहे. या बैठकीत प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्याची माहिती देशभरातील लोकांपर्यंत कशी पोहोचवायची याचा निर्णय घेतला जाईल.

राम मंदिराच्या प्राणपतिष्ठा साहळ्याचा बाजपला जास्त फायदा निवडणुकीत होईल असे बोलले जात आहे. राम मंदिर आंदोलन आणि मंदिर उभारणीत पक्षाची भूमिका स्पष्ट करणारी पुस्तिकाही तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय लोकसभा निवडणुकीपूर्वी नवीन मतदारांशी जोडण्यासाठी बूथ स्तरावर कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. भाजप आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षांनी मंदिराच्या बांधकामात कशाप्रकारे अडथळे आणण्याचा प्रयत्न केला यावर जोर देणार असल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: BJP in the field for the Lok Sabha elections Forming a committee, will contact the disgruntled leaders of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.