दिल्लीत सरकार स्थापनेची भाजपाकडून चाचपणी
By admin | Published: September 7, 2014 03:04 AM2014-09-07T03:04:56+5:302014-09-07T03:04:56+5:30
भाजपा सरकार स्थापनेच्या शक्यता तपासून पाहात आह़े विशेष म्हणजे अशा शक्यता तपासण्यात काहीही अनैतिक नसल्याचे पक्षनेतृत्वाचे मत आह़े
Next
काही अनैतिक नसल्याचा दावा : केजरीवालांचे मात्र मध्यस्थीसाठी राष्ट्रपतींना साकडे
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून घोडेबाजार सुरूअसून राष्ट्रपतींनी या प्रकरणी मध्यस्थी करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी पुढे रेटली असतानाच भाजपा मात्र सरकार स्थापनेच्या शक्यता तपासून पाहात आह़े विशेष म्हणजे अशा शक्यता तपासण्यात काहीही अनैतिक नसल्याचे पक्षनेतृत्वाचे मत आह़े
दिल्लीत सरकार स्थापनेत काहीही अनैतिक नाही, असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आह़े तिकडे केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी घोडेबाजाराचा आरोप धुडकावून लावत नायब राज्यपालांकडून सरकार स्थापनेचे औपचारिक निमंत्रण मिळाल्यानंतर पक्ष आपला निर्णय जाहीर करेल, असे स्पष्ट केले आह़े दिल्लीत निवडणुका न घेता सरकार स्थापनेच्या मुद्दय़ावर प्रदेश भाजपात मतभेद असल्याचे मानले जात आह़े मात्र सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार,
भाजपा नेतृत्वाने यासाठी अनुकूलता दर्शवली आह़े तथापि या आठवडय़ात होऊ घातलेल्या नवगठित भाजपा संसदीय बोर्डाच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय अपेक्षित आह़े
सर्वात मोठय़ा पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याची परवानगी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपतींकडे मागितल्याने विधानसभेत बहुमत नसतानादेखील भाजपाला दिल्लीत सरकार स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. जंग यांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या अहवालात दिल्लीतील राजकीय परिस्थितीचे सविस्तर विश्लेषण केले असून, दिल्लीत निर्वाचित सरकार गरजेचे असल्याचे नमूद केले आहे. या पाश्र्वभूमीवर शनिवारी एका खासगी वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना, पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपाला दिल्लीत सरकार स्थापनेचा अधिकार असल्याचे म्हटले आह़े भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आह़े दिल्लीच्या जनतेचा हा जनाधार आह़े अशा स्थितीत दिल्लीत सरकार स्थापनेसाठी समर्थन मिळविण्यात मला काहाही अनैतिक वाटत नाही़ दिल्लीत नव्याने निवडणुका कुणालाच नको आहेत, असेही ते म्हणाल़े दिल्लीचे राज्यपाल भाजपाला राज्यात सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देणार असल्याचे वृत्त असतानाच, असे औपचारिक आमंत्रण मिळाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे राजनाथसिंह यांनी सांगितल़े
दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून घोडेबाजार करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी धुडकावून लावला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
घोडेबाजाराची शंका
आम आदमी पार्टीचे सव्रेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सरकार स्थापनेसंदर्भात मध्यस्थी करावी, असे साकडे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना घातले आह़े दिल्लीच्या नायब राज्यपालांनी भाजपाला कुठल्या आधारावर सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याची परवानगी मागितली आहे, असा सवालही त्यांनी केला आह़े
भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नाही़ अशा स्थितीत आमदारांची खरेदी करून भाजपा सरकार स्थापन करू इच्छित़े भाजपाने यासाठी घोडेबाजार चालवला आह़े म्हणूनच राष्ट्रपतींनी या प्रकरणी मध्यस्थी करावी असे आम्हाला वाटते, असे केजरीवाल म्हणाल़े