भाजपमध्ये चाललंय काय? आयटी सेलच्या व्यक्तीकडून स्वपक्षीयांविरोधात पोस्ट; अटक होताच भाजप नेतेच भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 10:06 AM2021-05-26T10:06:02+5:302021-05-26T10:06:21+5:30

आयटी सेलमधील कर्मचाऱ्याला अटक होताच भाजपचेच नेते नाराज; राजीनामा देण्याचा इशारा

bjp it cell worker arrested for objectionable facebook posts against party leaders in gujarat | भाजपमध्ये चाललंय काय? आयटी सेलच्या व्यक्तीकडून स्वपक्षीयांविरोधात पोस्ट; अटक होताच भाजप नेतेच भडकले

भाजपमध्ये चाललंय काय? आयटी सेलच्या व्यक्तीकडून स्वपक्षीयांविरोधात पोस्ट; अटक होताच भाजप नेतेच भडकले

googlenewsNext

गांधीनगर: गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. सूरतचे भाजप अध्यक्ष नीरज झांझमेरा आणि पक्षातील अन्य नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मात्र या अटकेमुळे भाजपमधील अनेक नेते नाराज आहेत. त्यांनी या अटकेविरोधात आघाडी उघडली असून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचं नाव नितेश वनानी आहे. ते सूरतमध्ये भाजपच्या आयटी सेलमध्ये काम करायचे. सूरत सायबर क्राईम ब्रांचचे निरीक्षक प्रशांत खोखरांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश यांनी राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्या. त्यामुळे त्या नेत्यांची प्रतिमा मलीन झाली. या पोस्ट १९ वेगवेगळ्या फेसबुक अकाऊंटवरून करण्यात आल्या. ही सगळी अकाऊंट बोगस आहेत. या पोस्ट १२ कॉम्प्युटर्सवरून व्हायरल करण्यात आल्या. यामुळे नितेश वनानी यांना अटक करण्यात आली.

भारतात फेसबुक बंद होणार, पुढचा नंबर कोणाचा? जयंत पाटलांनी दिले संकेत

सूरतच्या पलसाणामध्ये वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते विभाभाई चोसला यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी नितेश यांना त्यांच्या कार्यालयातून अटक करण्यात आली. दंगल पसरवण्याची हेतूनं विधान करणं, शांततेचा भंग करणं, अश्लिल आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणं, गुन्हेगारी कारस्थान रचणं यासारखे गुन्हे नितेश यांच्याविरोधात दाखल करण्यात आले आहेत.

कॉमर्समध्ये पदवी मिळवलेले नितेश रियल इस्टेट ब्रोकर म्हणून काम करतात. ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते राहिले आहेत. नितेश यांच्या अटकेविरोधात सूरतमध्ये भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि नेते एकवटले आहेत. सूरत शहरातील ६ वॉर्ड अध्यक्ष, ४ महामंत्री यांचा यामध्ये समावेश आहे. यातील अनेकांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. सूरत भाजपमधील काही नेत्यांच्या इशाऱ्यावरून नितेश यांना अटक झाल्याचा आरोप या नेत्यांपैकी अनेकांनी केला आहे.

Web Title: bjp it cell worker arrested for objectionable facebook posts against party leaders in gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा