भाजपाला दक्षिणेत मिळाला आणखी एक मित्र, या राज्यातील समिकरणं बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 04:40 PM2023-09-08T16:40:37+5:302023-09-08T16:41:25+5:30

BJP-JDS Alliance: कर्नाटकमध्ये भाजपाला मित्र सापडला असून, भाजपा आणि जेडीएस यांच्यामध्ये होणाऱ्या संभाव्य आघाडीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

BJP-JDS Alliance: BJP got another friend in the south, will the equations change in Karnataka? | भाजपाला दक्षिणेत मिळाला आणखी एक मित्र, या राज्यातील समिकरणं बदलणार?

भाजपाला दक्षिणेत मिळाला आणखी एक मित्र, या राज्यातील समिकरणं बदलणार?

googlenewsNext

नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे भाजपाच्या ताब्यात असलेले दक्षिणेतील एकमेव राज्य त्यांच्या हातातून निसटले होते. या पराभवाचा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाला मोठा फटका बसेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, कर्नाटकमध्ये भाजपाला मित्र सापडला असून, भाजपा आणि जेडीएस यांच्यामध्ये होणाऱ्या संभाव्य आघाडीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी  मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपा आणि जेडीएस एकत्र मिळून निवडणूक लढवलीत, असा दावा केला आहे. तसेच भाजपा जेडीएसला लोकसभेच्या चार जागा देण्यास तयार झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. देवेगौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. तसेच आधीच चार जागा फायनल केल्या आहेत. मी त्यांचं स्वागत करतो, असं देवेगौडा यांनी म्हटलं आहे.  

भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी जेडीएसला चार जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी तशी हमी दिली आहे, असे देवेगौडा यांनी सांगितले. देवेगौडांचा जेडीएस पक्ष विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीपासून दूर राहिला होता. त्यामुळे जेडीएस भाजपासोबत आघाडी करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. सध्या कर्नाटकमध्ये जेडीएसच्या तुलनेत भाजपा बऱ्यापैकी तुल्यबळ आहे.

कर्नाटकमधील लोकसभेच्या २८ जागांपैकी २५ जागा भाजपाच्या ताब्यात आहे. तर जेडीएसने एका जागेवर विजय मिळवला होता. आता जेडीएस कर्नाटकमधील २४ पैका ४ जागांवर लढण्यास इच्छुक आहे. जेडीएसचा प्रभाव असलेल्या मांड्या, हासन, बंगळुरू ग्रामीण आणि चिकबल्लापूर या जागांसाठी जेडीएस इच्छुक आहे.  

Web Title: BJP-JDS Alliance: BJP got another friend in the south, will the equations change in Karnataka?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.