झारखंडचा कौल भाजपाला; जम्मू-काश्मीर त्रिशंकू?
By admin | Published: December 21, 2014 02:33 AM2014-12-21T02:33:28+5:302014-12-21T02:33:28+5:30
झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल तर जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा राहील, असा अंदाज विविध टीव्ही वाहिन्या आणि वृत्तसंस्थांनी मतदानोत्तर सर्वेक्षणातून (एक्झिट पोल) वर्तवला आहे.
‘एक्झिट पोल’चा अंदाज
नवी दिल्ली : झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल तर जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा राहील, असा अंदाज विविध टीव्ही वाहिन्या आणि वृत्तसंस्थांनी मतदानोत्तर सर्वेक्षणातून (एक्झिट पोल) वर्तवला आहे.
या दोन राज्यांमधील मतदानाचा पाचवा व अखेरचा टप्पा शनिवारी संपताच एक्झिट पोलचे निष्कर्ष जारी होऊ लागले. झारखंडमधील जनतेने नक्षलवाद्यांच्या धमक्या झुगारत तर काश्मिरींनी फुटीरतावाद्यांचे बहिष्काराचे आवाहन हाणून पाडत विक्रमी मतदान केले. झारखंडमध्ये पाचही टक्के मिळून सरासरी ६६ टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २५ वर्षांतील सर्वाधिक म्हणजे ७६ टक्के मतदान नोंदले गेले. दोन्ही ठिकाणी शांततेत निवडणूक पार पडणे ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. दोन्ही राज्यांमध्ये मंगळवार २३ डिसेंबर रोजी मतमोजणी सुरू होऊन दुपारपर्यंत निकाल जाहीर होतील.
एबीपी न्यूज-नेल्सनने वर्तवलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार झारखंडमध्ये भाजपाला ८१ पैकी ५२ जागा मिळतील. सी-व्होटरने जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवतानाच पीडीपी हा पक्ष ८७ पैकी ३२ ते ३८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल असा दावा (पान ८ वर)
जम्मू्-काश्मीरमधील मतदानाची एकूण टक्केवारी ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशी आहे. या राज्यामध्ये अखेरच्या टप्प्यात ७६ टक्के मतदान झाले. झारखंडमध्येही अखेरच्या टप्प्यात विक्रमी ७१ टक्के मतदानाची नोंद झाली.
- विनोद झुत्सी, निवडणूक उपायुक्त