आसामचे मुख्यमंत्री कोण?, सर्बानंद सोनोवाल आणि हिंमत बिस्वा सरमा यांना बोलाविले दिल्लीत, भाजपाची महत्त्वाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 10:26 AM2021-05-08T10:26:38+5:302021-05-08T10:27:47+5:30
important meeting to decide the name of assam next cm : आसाममध्ये भाजपाने पुन्हा सत्ता राखली आहे. मात्र, हिंमत बिस्वा सरमा हे सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याने भाजपाने अद्याप आसामचा मुख्यमंत्री निवडला नाही.
नवी दिल्ली : भाजपाने आसाममध्ये विजय मिळविल्यानंतर आता नवीन मुख्यमंत्र्याची निवड होण्याची शक्यता आहे. यासाठी आज दिल्लीत भाजपाची महत्त्वाची बैठक होणर आहे. नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि राज्यातील पक्षाचे बडे नेते हिंमत बिस्वा सरमा यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीत बोलविले आहे. त्यामुळे आसामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, ते पाहावे लागणार आहे. (bjp jp nadda important meeting to decide the name of assam next cm sarbananda sonowal and himanta vishwa sharma)
आसाममध्ये भाजपाने पुन्हा सत्ता राखली आहे. मात्र, हिंमत बिस्वा सरमा हे सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याने भाजपाने अद्याप आसामचा मुख्यमंत्री निवडला नाही. यावरून फक्त चर्चाच सुरू आहे. त्यामुळे आता जे. पी. नड्डा यांनी सर्बानंद सोनोवाल आणि हिंमत बिस्वा सरमा यांना दिल्लीत बोलविले आहे. आज सकाळी 10.30 वाजता हे दोन्ही नेते नड्डा यांना भेटणार असून त्यात राज्यातील नेतृत्वाचा तिढा सोडवण्यात येणार आहे. या बैकठीनंतर आसामच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स आज संपणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
("जगात नाचक्की! मोदींना राजकारणविरहित राष्ट्रवादाचा विचार करावा लागेल", शिवसेनेची खोचक टीका)
दरम्यान, भाजपाने विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून सर्बानंद सोनोवाल आणि हिंमत बिस्वा सरमा या दोन्ही नेत्यापैकी कोणाचेही नाव जाहीर केले नव्हते. त्यामुळे हे दोन्ही नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. येत्या एक दोन दिवसात मुख्यमंत्रीपदाचा हा तिढा सुटू शकतो, असे सांगितले जात आहे.
हिंमत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता
2016 मध्ये हिंमत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र, 2016च्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपाने सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली होती. पण, आता परिस्थिती बदलली आहे. बिस्वा सरमा यांनी केवळ आसामच्या पूर्वेकडील भागातच नव्हे तर संपूर्ण आसाममध्ये भाजपाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी हिंमत बिस्वा सरमा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. अशा परिस्थितीत भाजपाकडून आसामचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.