“PM मोदींना हटवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकांमध्ये चीन गडबड करण्याची शक्यता!”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 02:39 PM2021-05-27T14:39:50+5:302021-05-27T14:42:24+5:30
एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना हटवण्यासाठीही चीनने मदत केली होती, असेही या नेत्याने म्हटले आहे.
इंदोर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी २०२४ मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये चीन हस्तक्षेप करून गडबड करू शकतो, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. तसेच एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना हटवण्यासाठीही चीनने मदत केली होती, असेही या नेत्याने म्हटले आहे. केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. (bjp kailash vijayvargiya claims that china may disturb in 2024 election to remove pm modi)
भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी यासंदर्भातील दावा केला आहे. इंदोर येथील आपल्या निवासस्थानी ते मीडियाशी बोलत होते. आशिया खंडात केवळ भारतच असा देश आहे, जो या प्रकारच्या आव्हानाचा सामना करत आहे, असेही ते म्हणाले. तसेच कोरोना संकटाच्या काळात विरोधकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वागायला हवे. जनतेच्या समस्या, अडचणी सोडवण्यासाठी सरकारला सहकार्य करायला हवे, असे आवाहन विजयवर्गीय यांनी यावेळी केले.
“लोकं जगो अथवा नाही, निवडणुकीच्या तयारीला उशीर होता कामा नये”; माजी IAS अधिकारी
चीनचा पंतप्रधान मोदींवर राग
सुरुवातीला चीनने डोनाल्ड ट्रम्प यांना हटवण्यासाठी मदत केली होती. चीनचा पंतप्रधान मोदींवर राग आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींना हटवण्यासाठी चीन हस्तक्षेप करून गडबड करू शकतो, अशी शक्यता आहे. चीन अन्य कोणत्याही देशाला पुढे जाऊ देत नाही आणि पुढे जाण्याचा प्रयत्न कोणता देश करत असेल, तर त्याला मागे ओढण्यासाठी चीन वाट्टेल ते करतो. हेच चीनचे धोरण आहे, असेही विजयवर्गीय म्हणाले.
प्रायव्हसीचा आदर, पण गंभीर प्रकरणांची माहिती द्यायलाच हवी; केंद्राने Whatsapp ला बजावले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा केवळ भारताला सर्वाधिक फटका
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा केवळ भारतालाच सर्वाधिक फटका बसला आहे. आशिया खंडातील दुसऱ्या देशांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झळ इतक्या मोठ्या प्रमाणात बसली नाही. म्हणूनच भारतात त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होईल, याचा अंदाज कुणीच बांधला नव्हता. भारत आणि अमेरिका या देशांवर चीन नाराज असल्यासंबंधी जागतिक स्तरावरील मीडियामध्येही चर्चा सुरू आहे. कोरोना हा चीनचा मानवनिर्मित विषाणू असल्याची शक्यता आता अमेरिकन शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत, असेही विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.