भाजपाकडून निवडणूक कॅम्पेनचा व्हिडीओ लाँच, 'सर्जिकल अन् एअर स्ट्राईक'ची झलक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 02:58 PM2019-03-16T14:58:30+5:302019-03-16T15:06:41+5:30
देशाच्या विकासासाठी कष्ट करणारा प्रत्येकजण चौकीदार असल्याचं भाजपाने म्हटले आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या चौकीदार या प्रतिमेला देशपातळीवरील स्थानिक वर्गाशी जोडले आहे. तसेच, भारतीय सैन्यालाही चौकीदार असल्याचं दर्शविण्याचा प्रयत्न भाजपाच्या व्हिडीओतून दिसून येत आहे. केवळ मी एकटाच चौकीदार नाही, भ्रष्टाचाराची लढाई लढणारा, सामाजिक गुन्हेगारीशी लढणारा आणि वाईट प्रवृत्तींवर नजर ठेवणार प्रत्येक भारतीय चौकीदार असल्याचं मोदींनी म्हटले आहे. या व्हिडीओत सर्जिकल स्ट्राईकची झलक दिसून येत आहे.
देशाच्या विकासासाठी कष्ट करणारा प्रत्येकजण चौकीदार असल्याचं भाजपाने म्हटले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये भारतीय सैन्याची एक झलक दिसून येत आहे. या व्हिडीओतील एका भागात भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आणि एअर स्ट्राईकची झलक दिसून येत आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लष्कराच्या टॅँकवर बसल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे भाजपाकडून प्रचारासाठीच्या व्हिडीओतही सर्जिकल स्ट्राईक अन् एअर स्ट्राईकचा मुद्दा अग्रभागी असल्याचं दिसून येत आहे.
अतित अब नही सहूंगा, हाँ, मै चूप नही रहुंगा
माँ भारती का लाल हूँ, मै कब तलक नही कहुंगा
मै सरहदों के हौसलों, मै सरहदों के हौसलों के साथ एक हुँकार हूँ
हाँ मै भी चौकीदार हूँ.....
Your Chowkidar is standing firm & serving the nation.
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2019
But, I am not alone.
Everyone who is fighting corruption, dirt, social evils is a Chowkidar.
Everyone working hard for the progress of India is a Chowkidar.
Today, every Indian is saying-#MainBhiChowkidar
अशा काव्यात्मक पंक्ती या व्हिडीओतून गायल्या आहेत. मोदींनी आपल्या पहिल्याच प्रचार गीतामध्ये देशातीलप्रत्येक भारतीयाला जोडण्याचा प्रयत्न केला असून भारतीय लष्कराचाही यामध्ये समावेश केला आहे.
पाहा व्हिडीओ -