बंगालच्या रॅलीत अमित शाह यांचा 'शायराना' अंदाज; 'सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं...'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 03:01 PM2020-06-09T15:01:21+5:302020-06-09T15:09:29+5:30
आम्ही आमच्या सरकारचा हिशेब देत आहोत. ममताजी आपणही 10 वर्षांचा हिशेब द्या. मात्र त्यात, बॉम्ब स्फोट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूचे आकडे सांगून नका, असे शाह म्हणाले.
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी उपाध्यक्ष अमित शाह यांनी बिहार आणि ओडिशानंतर आज पश्चिम बंगालला व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमाने संबोधित केले. या सर्व सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने दिल्लीतूनच होत आहेत. यावेळी शाह यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना सीएए, राजकीय हिंसाचार आणि केंद्राच्या विविध योजना राज्यात लागू न केल्याच्या मुद्द्यावर घेरले. त्यांनी ममतांना सत्तेवरून बाजुला हटवण्याचेही आवाहन केले. यावेळी, भाषणाच्या शेवटी अमित शाह यांचा शायराना अंदाजही बघायला मिळाला. त्यांनी एक कविता ऐकवत बंगालमध्ये परिवर्तनाचा विश्वास जागवला.
कालापानी-लिपुलेख मुद्द्यावर नेपाळची माघार नाही, भारताविरोधात मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
पश्चिम बंगाल सरकारवर केंद्राच्या योजना लागू न करण्याचा आरोप करत आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान देत, शाह म्हणाले, हा राजकारणाचा मुद्दा नाही. त्यासाठी इतरही मैदानं आहेत. आपण मैनात तयार करा, दोन-दोन हात होऊन जातील. शाह म्हणाले, बंगालमध्ये सत्ता बदलेल आणि शपथविधी होताच एकामिनिटाच्या आत बंगालमध्ये आयुष्मान भारत योजना लागू केली जाईल.
बापरे! अखेर 'तो' खजिना सापडला, कोट्यवधींचं रहस्य 10 वर्षांनंतर उलगडलं...
अमित शाह यांनी भाषणाच्या शेवटी प्रसिद्ध कवी दुष्यंत कुमार यांची कविता ऐकवत बंगालमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले.
शह यांनी ऐकवलेली कविता -
हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए,
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए...
व्हर्च्युअल रॅलीवर अमित शाह म्हणाले, ममता बनर्जी, आपण बंगालच्या जनतेशी संवाद साधल्यापासून रोखू शकत नाही. आपण रोड आणि सभा रोखू शकता. मात्र, परिवर्तन रोखू शकत नाही.
Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अॅडव्हान्स्ड' व्हॅक्सीन
आम्ही आमच्या सरकारचा हिशेब देत आहोत. ममताजी आपणही 10 वर्षांचा हिशेब द्या. मात्र त्यात, बॉम्ब स्फोट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूचे आकडे सांगून नका, असे शाह म्हणाले.
जेव्हा सीएए कायदा संमत झाला, तेव्हा ममताजींचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. एवढा राग मी कधीच पाहिला नाही. ममताजी आपण सीएएचा विरोध करत आहात. नामशूद्र आणि मतुआ समाजापासून आपल्याला काय त्रास आहे? सीएएचा विरोध आपल्याला फार महागात पडेल. ही जनता आपल्याला राजकीय शरणार्थी बनवणार आहे, असेही शाह म्हणाले.
CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...
पश्चिम बंगालमध्ये 2014पासून 100हून अधिक भाजपा कार्यकर्त्यांनी संघर्ष करत आपला जीव गमावला आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांना प्रणाम करतो. जेव्हा बंगालमध्ये परिवर्तनाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात या कार्यकर्त्यांचीही नावे लिहिली जातील, असेही मोदी म्हणाले.