मुलांच्या तस्करीप्रकरणी भाजपा नेत्याला अटक
By admin | Published: March 1, 2017 01:21 PM2017-03-01T13:21:51+5:302017-03-01T13:28:28+5:30
लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी पश्चिम बंगालच्या भाजपा नेत्या जुही चौधरी यांना सीआयडीने भारत - नेपाळ सीमारेषेवरुन अटक आहे.
ऑनलाइन लोकमत
पश्चिम बंगाल, दि. 1 - लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी पश्चिम बंगालच्या भाजपा नेत्या जुही चौधरी यांना सीआयडीने भारत - नेपाळ सीमारेषेवरुन अटक आहे. मंगळवारी रात्री उशीरा सीआयडीच्या पथकाने खारीवाडी पोसिल स्थानकाच्या परिसरात जुही चौधरींना अटक केली.
जुहीच्या अटकेसाठी तृणमूलच्या युवक विद्यार्थी संघटनेनं अंदोलने केली होती. जुहीचे वडिल रविंद्र चौधरी भाजपाचे पश्चिम बंगाल राज्याचे सचिव आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, यापुर्वी लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी चंदना चक्रवर्तीने भाजपा नेत्या रुपा गांगुली, कैलाश विजयवर्गीय आणि जूही चौधरी यांचे नाव घेतले होते. 18 फेब्रुवारी रोजी सीआयडीने विमला शिशूगृहाच्या संचालिका चंदना चक्रवर्ती यांना अटक केली होती, त्यांना सहअरोपी म्हणून अटक करण्यात आल्याचे प्रथमिक वृत्त आहे.
सीआयडीने या प्रकरणी आतापर्यंत चार लोकांना अटक केली आहे. नवजात बालक आणि लहान मुलांची सीमेवर तस्करी करण्याचा या चौघांवर आरोप आहे. यामध्ये विमला शिशु गृहाच्या मुख्य दत्तक अधिकारी सोनाली मोंडल, अध्यक्षा चंदना चक्रवर्ती आणि त्यांचे भाऊ मानस भौमिक यांचा समावेश आहे. या तिघांवर 1 ते14 वयोगटाच्या 17 मुलांना विदेशात विकल्याचा आरोप आहे. आपले काम कायदेशीरित्या योग्य ठरवण्यासाठी त्यांनी या मुलांच्या आई-वडिलांनी दुसऱ्यांना दत्तक देण्यासाठी आपल्याकडे सोपवल्याचे नोंद केले आहे. ही सर्व प्रक्रिया त्यांनी कायदेशीरपणे केली आहे.