कर्नाटकात पुन्हा भाजपमध्ये कलह; मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हटवण्याची 'शत प्रतिशत' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 01:50 PM2021-03-21T13:50:52+5:302021-03-21T13:53:21+5:30

उत्तर भारतानंतर आता दक्षिण भारतातील कर्नाटकमध्येही अशाच प्रकारची मागणी होताना दिसत आहे.

bjp leader basanagouda yatnal demands that cm bs yediyurappa should be changed | कर्नाटकात पुन्हा भाजपमध्ये कलह; मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हटवण्याची 'शत प्रतिशत' मागणी

कर्नाटकात पुन्हा भाजपमध्ये कलह; मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हटवण्याची 'शत प्रतिशत' मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देआता कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याची मागणीसत्ता टिकवायची असेल, तर येडियुरप्पा यांना हटवावेया मुख्यमंत्र्यांसोबत निवडणुकांना सामोरे जाऊ शकत नाही - आमदार

बेंगळुरू: भारतीय जनता पक्षातील (BJP) अंतर्गत वाट पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अलीकडेच भाजपने उत्तराखंडमधील मुख्यमंत्री बदलला होता. उत्तर भारतानंतर आता दक्षिण भारतातील कर्नाटकमध्येही अशाच प्रकारची मागणी होताना दिसत आहे. मुख्यमंत्री येडियुप्पा यांना हटवावे, अशी मागणी भाजप आमदार बसनगौडा यतनाल यांनी केली आहे. (bjp leader basanagouda yatnal demands that cm bs yediyurappa should be changed)

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना १०० टक्के हटवायला हवे, अशी मागणी यतनाल यांनी केली. येडियुरप्पा यांच्यासोबत निवडणुकांच्या प्रचारासाठी जाऊ शकत नाही. भाजपला कर्नाटकात आपला जम कायम करायचा असेल, तर मुख्यमंत्री येडियुप्पा यांना हटवून दुसऱ्या माणसाची नियुक्ती करणे योग्य ठरेल. पक्ष नेतृत्वाला याबाबतची माहिती दिली आहे, असे यतनाल यांनी यावेळी स्पष्ट केले. 

राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास

भाजपचे सरकार 

विधानसभा निवडणुकीनंतर जनता दल सेक्युलरसोबत काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. भाजपला दूर ठेवण्यासाठी एचडी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. मात्र, आमदारांच्या असंतोषामुळे काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार कोसळले आणि भाजपने संधीचे सोने करत पुन्हा सरकार स्थापन केले. मात्र, आता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हटवण्याची मागणी होऊ लागली आहे. 

दरम्यान, अलीकडेच त्रिवेंद्र सिंह शेखावत यांना बाजूला करून भाजपने तीरथ सिंह रावत यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनवले. उत्तराखंडमधील ही मोठी राजकीय उलथापालथ असल्याचे सांगितले गेले. भाजप उपाध्यक्ष रमण सिंह आणि सरचिटणीस व राज्याचे प्रभारी दुष्यंत गौतम कोणताही नियोजित कार्यक्रम नसताना देहरादून येथे पोहचले होते. राज्याच्या कोअर कमिटीतील नेत्यांसोबत बैठक केली. यानंतर या दोघांनी आपला अहवाल भाजप अध्यक्ष नड्डा यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राजीनामा दिला होता. उत्तराखंडनंतर आता कर्नाटकातून उघडपणे मुख्यमंत्री बदलण्याची मागणी होऊ लागल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 

Web Title: bjp leader basanagouda yatnal demands that cm bs yediyurappa should be changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.