"हुड्डा कुटुंबाने बहिणी-मुलींची ...", ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, 'गरज पडली तर हरियाणाला जाईन'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 09:50 AM2024-09-09T09:50:35+5:302024-09-09T09:58:59+5:30
हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे, भाजपा आणि काँग्रेसने निवडणुकांची तयारी सुरु केली असून काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पूनिया यांना पक्षात प्रवेश दिला आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे, भाजपा आणि काँग्रेसने निवडणुकांची तयारी सुरु केली असून काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पूनिया यांना पक्षात प्रवेश दिला आहे. यावरुन आता भाजपाचे माजी खासदार ब्रिजभषण सिंह यांनी टीका केली आहे. 'महाभारताच्या काळात द्रौपदीला पणाला लावून जुगार खेळला गेला आणि पांडव हरले. त्यासाठी देश अजूनही पांडवांना माफ करू शकलेला नाही. हुड्डा परिवाराने आपल्या बहिणी आणि मुलींच्या इज्जतीवर जो जुगार खेळला त्याला भविष्यकाळ माफ करणार नाही', अशी टीका ब्रिजभूषण सिंह यांनी केली.
अजित डोभालांचे मिशन रशिया-युक्रेन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवली विशेष जबाबदारी
ब्रिजभूषण सिंह म्हणाले, 'माझ्यावर ठपका ठेवण्यात आलेल्या तीन घटनांच्या वेळी मी घटनास्थळी उपस्थित नव्हतो, जेव्हा हे सत्य सर्वांसमोर येईल तेव्हा ते उत्तर देऊ शकणार नाहीत. माझ्या कुंडलीत काँग्रेस बसली आहे, असंही ब्रिजभूषण सिंह म्हणाले. १९७४ मध्ये जेव्हा माझे घर पाडण्यात आले आणि माझ्यावर पहिला गुन्हा दाखल झाला, तेव्हाही काँग्रेसचे सरकार होते. टाडा लागू झाला तेव्हाही काँग्रेसचे सरकार होते, तर माझे कुटुंब जुने काँग्रेस पक्ष आहे. माझे वडील गोंडापूर्वी काँग्रेस पक्षाचे आमदार होते',असंही सिंह यांनी सांगितले.
'जंतरमंतर धरणे आंदोलनातही काँग्रेसचे कनेक्शन होते असा आरोपही सिंह यांनी केला. 'दीपेंद्र हुड्डा, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. प्रियांकाजीही आल्या, त्यांच काँग्रेसमध्ये मोठं नाव आहे. पहिल्या दिवशी असे वाटले की खेळाडूंचे आंदोलन आहे, पण नंतर सत्य बाहेर येण्यास सुरुवात झाल्यावर लोक दूर गेले. शेवटी भूपेंद्र हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील एक कुटुंब आणि एकच आखाडा उरला, असा टोलाही ब्रिजभूषण सिंह यांनी लगावला.