"शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार; ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार"!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 02:29 PM2021-03-23T14:29:51+5:302021-03-23T14:31:14+5:30

अनिल देशमुख प्रकरणावर बोलताना बापट म्हणाले, येत्या काळात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत बसून सर्व गोष्टींवर लक्ष आहे.

BJP leader Girish Bapat target to Sharad Pawar and Anil Deshmukh in delhi | "शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार; ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार"!

"शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार; ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार"!

Next

नवी दिल्ली: परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर, राज्यातील राजकारण जबरदस्त तापले आहे. यावरून आता भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनीही गृहमंत्री देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्य दडवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते शक्य नाही. कारण प्रसारमाध्यमे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही सर्व माहिती समोर येईल, असे बापट यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलत होते. (BJP leader Girish Bapat target to Sharad Pawar and Anil Deshmukh in delhi)

अनिल देशमुख प्रकरणावर बोलताना बापट म्हणाले, येत्या काळात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत बसून सर्व गोष्टींवर लक्ष आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि दुराचार बोकाळला आहे. माणसे बदलली तरी वृत्ती बदलत नाही. राज्यात सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून खंडणी वसूल करणे योग्य नाही. हे गंभीर आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी, अशी मागणीही बापट यांनी यावेळी केली. याशिवाय, कोण कुठे होते यापेक्षाही माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपात किती तथ्य आहे, हे महत्वाचे, असेही बापट म्हणाले.

15 फेब्रुवारीला अनिल देशमुख आयसोलेट नव्हते, मग काय करत होते? फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

त्यांना दोन तास दिले तरीही ते कमीच -
यावेळी, सभागृहात शिवसेना खासदारांना बोलण्यासाठी वेळ मिळाला नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. विनायक राऊत यांना वेळ मिळाला होता. मात्र, त्यांना दोन तास दिले तरीही ते कमीच पडतील, असा टोलाही बापटांनी यावेळी राऊत यांना लगावला. 

हे तर सरकार पाडण्याचं षडयंत्र -  नवाब मलिक
"अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांत कोणतही तथ्य नाही. ते २७ फेब्रुवारीपर्यंत कुणालाही भेटलेले नाहीत. फडणवीस केवळ बेछुट आरोप करून सरकारला बदनाम करण्याचं काम करत आहेत. राजकीयदृष्ट्या हे सरकार पाडता आलं नाही म्हणून आता अधिकाऱ्यांचा वापर करुन ते सरकार पाडण्याचं षडयंत्र रचत आहेत", असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला. 

अनिल देशमुखांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण, तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा; भाजप नेत्याचा टोला

पोलिसांच्या बदल्यात गृहमंत्री  करत नाही
पोलिसांच्या बदल्यांच्या संदर्भात फडणवीस गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर करत असलेले आरोप बाळबोध असल्याचंही नवाब मलिक म्हणाले. "पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी एक आयपीएस अधिकाऱ्यांची समिती असते. कोणताही गृहमंत्री थेट पोलिसाची बदली करत नाही. फडणवीस फक्त खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. दिल्लीत जाऊन गृहसचिवांना पुरावे देण्याची भाषा ते करत आहेत. त्यांना फक्त दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची बदनामी करायची आहे इतकाच त्यांचा उद्देश आहे", असा टोलाही नवाब मलिक यांनी यावेळी लगावला आहे. 
 

Web Title: BJP leader Girish Bapat target to Sharad Pawar and Anil Deshmukh in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.