राज्यातील १८ मतदारसंघ भाजपच्या हिटलिस्टवर; नड्डांनी फोडला 'मिशन महाराष्ट्र'चा नारळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 02:38 PM2023-01-02T14:38:45+5:302023-01-02T15:40:35+5:30
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. राज्यातील १८ लोकसभा मतदार संघांसाठी भाजपने मिशन सुरू केले आहे. या पार्श्वभूमिवर आज जे. पी नड्डा यांनी चंद्रपुरात भाजपचा मेळावा घेऊन संबोधित केले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. राज्यातील १८ लोकसभा मतदार संघांसाठी भाजपने मिशन सुरू केले आहे. या पार्श्वभूमिवर आज जे. पी नड्डा यांनी चंद्रपुरात भाजपचा मेळावा घेऊन संबोधित केले. जग जेव्हा संकटातून जात आहे, प्रत्येक देश या संकटातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्या देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. मंदीच्या दिवसातही भारत ब्रिटनला पाठिमागे टाकून पाचव्या नंबरवर गेला आहे, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले.
या मंदीच्या दिवसातही भारताची अर्थव्यवस्था चांगली आहे. आज अमेरिका आणि रशिया संकटातून जात आहेत, पण, भारत अर्थव्यवस्था स्थीर करण्याचा प्रय़त्न करत आहे. आज आपण स्टीलमध्ये जगात दोन नंबरला आहे. आपल्या देशात ५७ टक्के मोबाईल बनवले जातात, असंही जे.पी.नड्डा म्हणाले.
या सर्व गोष्टी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात करत आहोत. आज आपण देशात आरामात आहोत, मास्क कुणीही वापरत नाही. चीन, अमेरिकेत अजुनही कोरोना मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेत अजुनही लसीकरण पूर्ण झालेले नाही, युरोपमध्येही तिच परिस्थीती आहे. चीनची अवस्था आपण पाहतो आहे, तेच भारतात २२० कोटी लसीकरण तसेच बुस्टर डोस झाले आहेत, असंही जे.पी.नड्डा म्हणाले.
नव्या वर्षात 'ही' चूक करु नका, नाहीतर तुमचे PPF खाते बंद होऊ शकत
काँग्रेसला या गोष्टी लक्षात नाहीत. या देशात पोलिओ वरील औषध आणण्यासाठी २८ वर्ष लागली. जपानी तापावरील औषध आणण्यासाठी कित्येक वर्ष लागले, असा टोलाही नड्डा यांनी लगावला. कोरोनावरील लस फक्त ९ महिन्यात आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या देशातील शास्त्रज्ञांना प्रोत्साहीत केले. भारत देश आता मागणारा नाही तर देणारा आहे, असंही जे.पी.नड्डा म्हणाले.