600 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी कर्नाटकमधील भाजपा नेते जनार्दन रेड्डी यांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 04:09 PM2018-11-11T16:09:37+5:302018-11-11T16:31:34+5:30

सुमारे 600 कोटी रुपयांच्या पॉन्जी इन्वेस्टमेंट घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते आणि माजी राज्यमंत्री जनार्दन रेड्डी यांना सेंट्रल क्राइम ब्रँचने अटक केली आहे.

BJP leader Janardhana Reddy arrested in connection with 600 crores scam | 600 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी कर्नाटकमधील भाजपा नेते जनार्दन रेड्डी यांना अटक 

600 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी कर्नाटकमधील भाजपा नेते जनार्दन रेड्डी यांना अटक 

Next

बंगळुरू -  सुमारे 600 कोटी रुपयांच्या पॉन्जी इन्वेस्टमेंट घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते आणि माजी राज्यमंत्री जनार्दन रेड्डी यांना सेंट्रल क्राइम ब्रँचने अटक केली आहे. जनार्दन रेड्डी यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि या प्रकरणातील मुख्य आरोपीला पैशांची अवैध पद्धतीने देवाण घेवाण करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. रेड्डी यांच्याबरोबरच त्यांचा सहकारी महफूझ अली खान यालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने  जनार्दन रेड्डी यांना 24 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.




जनार्दन रेड्डी हे शनिवारी एजन्सीसमोर हजर झाले होते. दरम्यान, क्राइम ब्रँचचे सीपी आलोक कुमार यांनी सांगितले की सबळ पुराव्यांच्या आधारावर रेड्डी यांना अटक करण्यात आली आहे. आता रेड्डी यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येईल. तसेच जप्त करण्यात आलेले पैसे गुंतवणुकदारांना दिले जातील. 




 रेड्डी आणि खान यांनी अँबिडेट मार्केटिंगकडून 18 कोटी रुपये किमतीचे सुमरा 57 किलो सोने घेतले होते. हे सोने प्रवर्तन निर्देशालयाच्या अधिकाऱ्यांपासून अँबिडेंटचे प्रमोटर सय्यद अहमद फरीद यांना चौकशीत ढिलाई मिळवून देण्यासाठी घेण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणात क्राइम ब्रँचने रेड्डी आणि खान यांना रविवारी चौकशीसाठी नोटीस पाठवले होते.  

Web Title: BJP leader Janardhana Reddy arrested in connection with 600 crores scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.