भाजपा नेते कृष्ण, युपी द्रौपदी तर राहूल, अखिलेश आदी कौरव - युपीमधलं पोस्टर
By admin | Published: April 16, 2016 02:41 PM2016-04-16T14:41:10+5:302016-04-16T14:41:10+5:30
भाजपाचे नेते कृष्ण, उत्तर प्रदेश म्हणजे वस्त्रहरणाचं संकट आलेली द्रौपदी आणि काँग्रेस, जनता दल आदी विरोधक म्हणजे कौरव असं वादग्रस्त पोस्टर्स भाजपाच्या कार्यकर्त्यांनी युपीमध्ये लावली
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 16 - भाजपाचे नेते कृष्ण, उत्तर प्रदेश म्हणजे वस्त्रहरणाचं संकट आलेली द्रौपदी आणि काँग्रेस, जनता दल आदी विरोधक म्हणजे कौरव असं वादग्रस्त पोस्टर्स भाजपाच्या कार्यकर्त्यांनी युपीमध्ये लावली असून राज्यामध्ये निवडणुकांचे वारे कुठले रंग दाखवतील याची झलक दिसत आहे.
भाजपाच्या उत्तर प्रदेशच्या अध्यक्षपदाची धुरा केशव मौर्य यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मौर्य यांना कृष्णाच्या वेशात दाखवण्यात आले आहे, उत्तर प्रदेश राज्य म्हणजे द्रौपदी तर अखिलेश यादव, मायावती, आझम खान, असदुद्दीन ओवेसी आणि राहूल गांधी द्रौपदीचं वस्त्रहरण करताना दाखवलं आहे.
रुपेश पांडे या भाजपाच्या कार्यकर्त्याचं नाव व फोटो या पोस्टरच्या तळाशी आहे, परंतु भाजपाने हे आपलं अधिकृत पोस्टर नसल्याचं म्हटलं आहे. वर्षभरातच उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून आत्तापासून राजकीय वातावरण तापायला लागल्याची चुणूक यातून दिसत आहे.