भाजप नेत्याची लव्ह स्टोरी: पती करेल मॉर्निंग वॉक, रात्री लावणार नाही चश्मा; पोलीस ठाण्यात विचित्र करार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 02:15 PM2021-07-30T14:15:15+5:302021-07-30T14:17:56+5:30

न्यूयॉर्कच्या या तरुणीची 2018मध्ये नदीमसोबत फेसबुकवर मैत्री झाली. यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काही दिवसांनी त्यांचा निकाह झाला.

BJP leader love story Ludgement has been reached between Nadeem and new york girl in the police station | भाजप नेत्याची लव्ह स्टोरी: पती करेल मॉर्निंग वॉक, रात्री लावणार नाही चश्मा; पोलीस ठाण्यात विचित्र करार

भाजप नेत्याची लव्ह स्टोरी: पती करेल मॉर्निंग वॉक, रात्री लावणार नाही चश्मा; पोलीस ठाण्यात विचित्र करार

Next

लखनौ - उत्तर प्रदेशात न्यूयॉर्कच्या एका महिलेने पती तथा भाजप नेत्यावर केलेले आरोप सिद्ध झाले नाही. आरोपी नदीमचे ना आधी लग्न झाले आहे, ना त्याला मुलं आहेत. संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात दोन अटी ठेवल्या आहेत. की पती सकाळी उठूण तिच्यासोबत मॉर्निंग वॉकसाठी जात जाईल आणि रात्रीच्या वेळी चश्मा लावणार नाही. तिच्या पतीने तिच्या या दोन्ही अटी मान्य केल्या आहेत. यानंतर दोघेही आनंदाने घरी गेले. (BJP leader love story Ludgement has been reached between Nadeem and new york girl in the police station)

न्यूयॉर्कच्या या तरुणीची 2018मध्ये नदीमसोबत फेसबुकवर मैत्री झाली. यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काही दिवसांनी त्यांचा निकाह झाला. ही  तरुणी बुधवारी दिल्लीगेट पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने तक्रार करत, नदीम विवाहीत असून त्याला दोन मुलं आहेत, असा आरोप केला. यानंतर पोलिसांनीही चौकशी केली. यात संबंधित  तरुणीचे आरोप निराधार असल्याचे समजले. पोलिसांच्या चौकशीनंतर संबंधित तरुणीचे समाधान झाले. 

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, यासंदर्भात, आम्ही आपली काय मदत करू शकतो, असे पोलिसांनी संबंधित तरुणीला विचारले असता, ती म्हणाली, की नदीम सकाळी तिच्यासोबत मॉर्निंग वॉकला जावे आणि रात्री चश्मा वापरू नये. यावर आरोपीने तरुणाची अट मान्य केली आणि त्यानंतर करार लिहिला गेला.

लग्नाच्या मध्यरात्री नवरीनं ‘असा’ प्रताप केला की नवरदेवासह कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठलं अन्....

सीओ कोतवाली अरविंद चौरसिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या अटीवर करार झाला आहे. आता महिला नदीम सोबत गेली आहे.  नदीम भाजप नेता असून, भाजपच्या अल्पसंख्यक मोर्चाशी संबंधित आहे.

असं होतं प्रकरण - 
न्यूयॉर्कच्या तरुणीचे मेरठ शहरातील नदीमसोबत दोन वर्षांपूर्वी फेसबुकवरून प्रेम प्रकरण सुरू झाले. या दोघांनीही निकाह केला. यानंतर तरुणीला समजले, की नदीमला दोन मुलं आहेत. यावर तिने राडा केला. एवढेच नाही, तर तिने पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.

सांगण्यात येते, की दिल्लीतील एका फार्म हाऊसमध्ये दोघांनी लग्न केले होते. लग्नानंतर ही मुलगी पुन्हा न्यूयॉर्कला निघून गेली होती. ती परल्यानंतर नदीम विवाहीत असल्याचा संशय तिला आला. आता दोघांतही पोलीस ठाण्यात करार झाला आहे.

Web Title: BJP leader love story Ludgement has been reached between Nadeem and new york girl in the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.