Delhi Election Results : मनोज तिवारी म्हणाले होते ट्विट संभाळून ठेवा; आता होत आहे ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 02:50 PM2020-02-11T14:50:17+5:302020-02-11T14:57:31+5:30
एव्हीमला दोष देऊ नका. तर मी केलेला हा ट्वीट सांभाळून ठेवा,असेही तिवारी म्हणाले होते.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निकालाचे चित्र आता स्पष्ट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर आम आदमी पार्टी पुन्हा एकदा दिल्लीत विजयी झेंडा फडकवणार असल्याचे दिसत आहे. एकीकडे अरविंद केजरीवाल विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्याच्या दिशीने जात असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
तिवारी यांनी 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर ट्वीट करत म्हंटले होते की, सर्व सर्वे खोटे ठरणार असून, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 48 जागा मिळतील आणि आम्ही सरकार सुद्धा बनवू. त्यांनतर एव्हीमला दोष देऊ नका. तर मी केलेला हा ट्वीट सांभाळून ठेवा,असेही तिवारी म्हणाले होते.
ये सभी एग्ज़िट पोल होंगे fail..
— Manoj Tiwari (@ManojTiwariMP) February 8, 2020
मेरी ये ट्वीट सम्भाल के रखियेगा..
भाजपा दिल्ली में ४८ सीट ले कर सरकार बनायेगी .. कृपया EVM को दोष देने का अभी से बहाना ना ढूँढे..?
मात्र, आता निकालाचे चित्र वेगळे दिसत असून आम आदमी पार्टी 62 तर भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे. तर पुन्हा केजरीवाल सरकार दिल्लीत स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे. त्यामुळे मनोज तिवारी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
Manoj Tiwari : BJP will win 48 seats
— Muhammad Amanullah (@__ladka__) February 11, 2020
*gets stuck on 18 seats*#DelhiElectionResults
Whole Delhi : pic.twitter.com/hLn707jGmI
Hey @ManojTiwariMP what happened.?
— Rohit Fadtare (@FadtareRohit) February 11, 2020
BJP lost delhi.. pic.twitter.com/Z81uBZbkby