मोदी सरकारनंही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचकाच केला, भाजपच्या 'या' बड्या नेताचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 01:07 PM2021-06-01T13:07:06+5:302021-06-01T13:10:16+5:30

"मोदी सरकारने यूपीएकडून तयार झालेली अर्थव्यवस्थेतील गडबड आणखी वाढवली, आता अधिकांश भारतीय माझ्या बोलण्याशी सहमत..."

BJP leader MP Subramanyam Swami said Narendra Modi government too has lost its economy most indians agree with me | मोदी सरकारनंही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचकाच केला, भाजपच्या 'या' बड्या नेताचा घरचा आहेर

मोदी सरकारनंही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचकाच केला, भाजपच्या 'या' बड्या नेताचा घरचा आहेर

Next
ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामी (subramanian swamy) यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवरला घरचा आहेर दिला आहे.स्वामी यांनी ट्विट केले आहे, की आता अधिकांश भारतीय माझ्या या म्हणण्याशी सहमत आहेत.यापूर्वीही स्वामींनी चीन, कोरोना व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्था आदी विषयावर आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी (subramanian swamy) यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवरला घरचा आहेर दिला आहे. स्वामी यांनी ट्विट करत, मोदी सरकार आर्थिक आघाडीवर अयशस्वी ठरल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर मोदी सरकारनेही अर्थव्यवस्थेचा पार विचका केला. माझ्या या बेलण्याला अधिकांश भारतीय लोक सहमत आहेत, असेही स्वामी यांनी म्हटले आहे. (BJP leader MP Subramanyam Swami said Narendra Modi government too has lost its economy most indians agree with me)

स्वामी यांनी ट्विट केले आहे, की आता अधिकांश भारतीय माझ्या या म्हणण्याशी सहमत आहेत, की मोदी सरकारने यूपीएकडून तयार झालेली अर्थव्यवस्थेतील गडबड आणखी वाढवली आहे. ही अर्थव्यवस्था अजूनही सुधारली जाऊ शकते. मात्र, सध्या हे कसे करायचे, हे सरकारला माहित नाही. यापूर्वीही स्वामींनी चीन, कोरोना व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्था आदी विषयावर आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत.

मोदी सरकारला सापडला निधी मिळवण्याचा 'महामार्ग'; तब्बल ८५ हजार कोटी उभारणार

स्वामींच्या या अर्थव्यवस्थेसंदर्भातील ट्विटवर अनेक लोकांनी कमेन्ट केल्या आहेत. उदयन मजूमदार नावाच्या एका युझरने (@yudi15) म्हटले आहे, आपल्याला अर्थमंत्री बनवायला हवे होते. मला वाटते, की या सरकारला आपल्या सारख्या विद्वानांची अॅलर्जी आहे. जे खरोखरच परिवर्तन करू शकतात. तर एका युझरने (@seas_master) म्हटले आहे, आपल्यासाठी सन्मानाने सेवानिवृत्त होण्याची वेळ आली आहे.

गडकरींबाबतचा प्रस्ताव स्वीकारला असता तर... -  
तत्पूर्वी, सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, नितीन गडकरींबाबाबतचा माझा प्रस्ताव स्वीकारला असता तर बरं झालं असतं. देशात कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. यामुळे कोरोनाविरोधी लढाईची सूत्रे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हातात द्यायला हवी, असा प्रस्ताव मी दिला होता. हा प्रस्ताव स्वीकारला असता तर आज कोरोनाची स्थिती सरकारच्या चौकटीत राहिली असती. पण आता देशातील कोरोनाच्या स्थितीवर सुप्रीम कोर्टाने समिती नेमली आहे. सॉलिसिटर जनरल कोर्टाला शरण गेले आहेत. आधी गृहमंत्रालय आदेश देत होते. आता सरकारला सुप्रीम कोर्टाचे ऐवकावे लागणार आहे. लोकशाही देशात हा एक प्रकारे सरकारचा पराभव आहे, अशी गंभीर टीका करत सुब्रमण्यन स्वामींनी केंद्र सरकारला पुन्हा घरचा आहेर दिला होता.

2 Years of Modi 2.0: कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर जनता खूश, पण मोदी सरकारच्या कृषि कायद्यांबाबत वेगळा कौल!

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक प्रभावित होतील - 
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर एक दावा करत खळबळ उडवून दिली आहे. स्वामी यांच्या दाव्यानुसार देशात जेव्हा तिसरी लाट येईल तेव्हा त्यात लहान मुले, बालके (Childrens) मोठ्या प्रमाणावर प्रभावित होतील, यासाठी आजच काळजी घ्यावी लागेल, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते. 

Web Title: BJP leader MP Subramanyam Swami said Narendra Modi government too has lost its economy most indians agree with me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.