... पण आजारी मानसिकतेवर औषध येणार नाही; निलेश राणेंची अखिलेश यादवांवर टीका 

By जयदीप दाभोळकर | Published: January 2, 2021 04:49 PM2021-01-02T16:49:06+5:302021-01-02T16:51:31+5:30

कोरोना विषाणूवरील लसीवरून राजकारणाला सुरूवात, भाजपावर विश्वास नसल्याचं अखिलेश यादवांचं वक्तव्य

bjp leader nilesh rane criticize sp akhilesh yadav over his comment on corona virus vaccine | ... पण आजारी मानसिकतेवर औषध येणार नाही; निलेश राणेंची अखिलेश यादवांवर टीका 

... पण आजारी मानसिकतेवर औषध येणार नाही; निलेश राणेंची अखिलेश यादवांवर टीका 

Next
ठळक मुद्देभाजपाची लस आपण घेणार नसल्याचं अखिलेश यादवांनी केलं होतं वक्तव्यआपलं सरकार बनल्यावर सर्वांना मोफत लस देणार असल्याचं म्हणाले होते अखिलेश यादव

आता भारतातही कोरोना लसीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच करोना लसीकरणाबाबत सरकारही व्यापक मोहीम हाती घेण्याच्या तयारीत आहे. परंतु आता लसीकरणावरूनच राजकारणाला सुरुवात करण्यात आली आहे. आपला भाजपावर विश्वास नसून भाजपाकडून देण्याच येणारी कोरोनावरील लस आपण घेणार नसल्याचं वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केलं. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी अखिलेश यादव यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 

"काय म्हणणार अशा माणसांना जे औषधांमध्येही पक्ष शोधतात. प्रत्येक आजारावर लस येईल. पण आजारी मानसिकतेवर कधीच औषध येणार नाही आणि जोपर्यंत ही आजारी मानसिकता भारतातून जात नाही तो पर्यंत आपल्या देशाचं काही खरं नाही," असं म्हणत निलेश राणे यांनी अखिलेश यादवांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. 



काय म्हणाले होते अखिलेश यादव?

"जे सरकार टाळ्या आणि थाळ्या वाजवत होते तेच सरकार आता लसीकरणासाठी मोठी साखळी का तयार करत आहे? टाळ्या आणि थाळ्या वाजवूनच कोरोनाला का पळवून लावत नाहीत. मी सध्यातरी कोरोनावरील लस घेणार नाही. माझा भाजपाच्या लसीवर विश्वास नाही. जेव्हा आमचे सरकार बनेल तेव्हा सर्वांना मोफत लस देऊ, आम्ही भाजपाची लस घेऊ शकणार नाही," असं अखिलेश यादव म्हणाले. याव्यतिरिक्त अखिलेश यादव यांनी भाजपावर खोटी आश्वासने दिल्याचा आरोप केला. "गेल्या काही वर्षांत देशाने खूप कठीण दिवस पाहिले आहेत. एवढे वाईट आणि काळे दिवस आम्ही पाहिले नव्हते. उत्तर प्रदेश सरकारने एवढी खोटी आश्वासने दिली आहेत की, आपण कल्पानाच करू शकणार नाही," असंही ते म्हणाले.

 

Read in English

Web Title: bjp leader nilesh rane criticize sp akhilesh yadav over his comment on corona virus vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.