बापरे! भाजपा नेत्याने Amazon वरून 30 हजारांची साउंड सिस्टीम मागवली; बॉक्स उघडताच रद्दी मिळाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 04:31 PM2022-05-01T16:31:48+5:302022-05-01T16:37:12+5:30

Amazon शॉपिंग साईटवरून 30 हजार रुपये किमतीची साऊंड सिस्टीम खरेदी केली होती. त्यांच्या या उत्पादनाची डिलिव्हरी झाली तेव्हा त्यात रद्दीच्या वस्तू बाहेर आल्या आहेत.

bjp leader ordered 30 thousand rupees sound system from amazon when the box was opened junk found | बापरे! भाजपा नेत्याने Amazon वरून 30 हजारांची साउंड सिस्टीम मागवली; बॉक्स उघडताच रद्दी मिळाली

बापरे! भाजपा नेत्याने Amazon वरून 30 हजारांची साउंड सिस्टीम मागवली; बॉक्स उघडताच रद्दी मिळाली

Next

नवी दिल्ली - ऑनलाईन खरेदी करण्याकडे अनेकांचा अधिक कल असतो. ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. अ‍ॅमेझॉनवरूनभाजपा नेत्याने तब्बल 30 हजारांची साउंड सिस्टीम मागवली होती. मात्र पार्सल उघडून पाहिल्यावर मोठा धक्का बसला आहे. यावेळी रेवाडीचे भाजपा नेते सुनील मूसेपूर हे ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरले आहेत. 

Amazon शॉपिंग साईटवरून 30 हजार रुपये किमतीची साऊंड सिस्टीम खरेदी केली होती. त्यांच्या या उत्पादनाची डिलिव्हरी झाली तेव्हा त्यात रद्दीच्या वस्तू बाहेर आल्या आहेत. बॉक्सच्या आत एक जुना स्पीकर आणि पुठ्ठा होता. रेवाडी शहरातील सेक्टर 1 मध्ये राहणारे भाजपा नेते सुनील मूसेपूर यांनी काही दिवसांपूर्वी लोकप्रिय शॉपिंग साइट Amazon वरून सुमारे 30 हजार किमतीची साउंड सिस्टम ऑर्डर केली होती. डिलिव्हरी बॉय सामान पोहोचवण्यासाठी आला होता. 

ऑनलाईन फसवणुकीचे किस्से भाजपाच्या नेत्यांना माहीत होते असे म्हणून त्याने डिलिव्हरी बॉयसमोर बॉक्स उघडला. त्यानंतर जे पाहिले ते पाहून तो थक्क झाला. बॉक्समधील साऊंड सिस्टीम ऐवजी रद्दी बाहेर आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचले आणि तक्रारीच्या आधारे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. डिलिव्हरी बॉय संदीपने कंपनीच्या गोदामातून त्यांना माल दिला जातो.  बॉक्सच्या आत काय केले जाते याची त्यांना जाणीव नसते. ते फक्त यादीनुसारच माल देतात असं म्हटलं आहे. 

सध्या पोलिसांनी या प्रकरणी तक्रार घेऊन तपास सुरू केला आहे. अशा परिस्थितीत हे उत्पादन पॅकिंग कुठून केले होते, हे तपासानंतरच स्पष्ट होईल. पॅकिंग केल्यानंतर ही रद्दी कोणाच्या हातात गेली आणि कुठून या बॉक्समध्ये भरून डिलिव्हरीसाठी पाठवली गेला याविषयी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपाप करत आहेत. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bjp leader ordered 30 thousand rupees sound system from amazon when the box was opened junk found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.