खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी सीटवरून वाद घातला, विमानाला ४५ मिनिटे उशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 05:42 AM2019-12-23T05:42:31+5:302019-12-23T05:43:47+5:30
दिल्ली-भोपाळ प्रवास : विमान कर्मचाऱ्यांनी गैरवर्तणूक केल्याची ठाकूर यांची तक्रार
नवी दिल्ली : भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा स्पाईस जेटच्या विमान कर्मचाऱ्यांसोबत सीटवरून वाद झाल्यामुळे विमानाला ४५ मिनिटे उशीर झाला. विमान कर्मचाºयांनी आपल्याशी गैरवर्तणूक केल्याची तक्रार ठाकूर यांनी केली आहे. दिल्ली-भोपाळ विमानात हा प्रकार घडला. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या प्रज्ञा ठाकूर यांनी भोपाळ विमानतळ संचालकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी बुक केलेले सीट मला देण्यास विमान कर्मचाºयांनी नकार दिला. त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केले.
स्पाईस जेटच्या कर्मचाºयांनी यापूर्वीही एकदा माझ्याशी अशीच गैरवर्तणूक केली होती. त्यावेळी तर मी बुक केलेले सीटही त्यांनी मला दिले नव्हते. स्पाईस जेटने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रज्ञा ठाकूर यांनी १ ए सीट बुक केले होते. तथापि, त्या विमानात स्वत:ची व्हिलचेअर घेऊन आल्या होत्या. त्यामुळे नियमानुसार, त्यांना बिगर-आपत्कालीन (नॉन-इमर्जन्सी) रांगेतील सीटवर जाण्यास सांगण्यात आले. त्याला त्यांनी नकार दिला. त्यामुळे विमानाला उशीर झाला. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यावरून झालेल्या वादावादीमुळे विमानाला ४५ मिनिटे उशीर झाला.
प्रकरण काय?
च्भोपाळ विमानतळाबाहेर पत्रकारांशी बोलताना प्रज्ञा ठाकूर यांनी सांगितले की, विमान कंपनीच्या कर्मचाºयांनी माझ्याशी योग्य प्रकारे वर्तन केले नाही. मी त्यांना नियम दाखविण्यास सांगितले. मी संचालकांकडे तक्रार दाखल केली आहे.
च्स्पाईस जेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, सुरक्षा कारणास्तव या विमानातील पहिल्या रांगेतील सीट व्हिलचेअरवरील प्रवाशांना दिले जात नाही. खासदारांनी व्हिलचेअर कंपनीकडे बुक केलेली नव्हती, त्यामुळे कर्मचाºयांना त्या व्हिलचेअरवर आहेत, हे माहिती नव्हते. शेवटी त्यांनी २ बी हे सीट स्वीकारल्यानंतर विमान उडू शकले.